नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , स्वातंत्र्य दिना दिवशी केनवडे ग्रामस्थांनी दुर्लक्षित कामाचे फलक लावून मानले ग्रामपंचायतीचे आभार – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

स्वातंत्र्य दिना दिवशी केनवडे ग्रामस्थांनी दुर्लक्षित कामाचे फलक लावून मानले ग्रामपंचायतीचे आभार

केनवडे येथे ग्रामस्थांनी लावलेले फलक

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

बातमीदार/केनवडे

दिनांक-15/08/2023.

           शासनाने स्वच्छतेच्या बाबतीत अनेक योजना सुरू केल्या, त्यासाठी ग्रामपंचायतीला थेट फंड ही दिला जातो. मात्र, त्या योजना राबवताना किंवा त्याची अंमलबजावणी करताना त्यामध्ये पारदर्शकता आणली जात नाही असाच प्रकार कागल तालुक्यातील केनवडे ग्रामपंचायतीच्या बाबतीत झालेला आहे.

           गावातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये तळी गल्ली आहे. त्या ठिकाणी पूर्व बाजूच्या पडझड झालेल्या गटारी मधून सांडपाणी साचून राहते व साचलेल्या सांडपाण्याचा मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त वास येतो. त्या प्रभाग मधील दक्ष नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी व साचलेले पाण्याची योग्य विल्हेवाट लाऊन गटर्स मोकळी करण्यासाठी दिनांक – 28/12/2022 रोजी अर्ज केला होता.

केनवडे येथे ग्रामस्थांनी लावलेले फलक

पण ग्रामपंचायतीने त्यांच्या समस्येकडे अद्याप दुर्लक्ष केले आहे. अखेर ग्रामस्थांनी गावच्या मध्यभागी आपल्या समस्यांचे डिजिटल बोर्ड लावून ग्रामपंचायतीच्या कारभारावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या .हा डिजिटल बोर्ड गावामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

  जाहिरात

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा