नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सावर्डे पाटणकर गावात अजगर सदृश्य प्राण्याचे दर्शन  – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

सावर्डे पाटणकर गावात अजगर सदृश्य प्राण्याचे दर्शन 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

सावर्डे पा.(दि. १५ ऑगस्ट ) : राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर गावात सोमवार दिनांक १४ ऑगस्ट रोजी रात्री ८:०० वाजता अजगर सदृश प्राण्याचे दर्शन घडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अजगर सदृश्य प्राण्याचे टिपलेले क्षणचित्र

याबाबत मिळालेली माहिती अशी , सुशांत सावंत हा युवक आपल्या मित्रासोबत आपल्या गावी रात्री ८:०० वाजण्याच्या सुमारास सुळंबी मार्गे येत असताना वाटेत

नामदेव सुर्यवंशी यांच्या विटांच्या आव्याजवळ गाडीच्या हेडलाईट समोर रस्त्यावर जवळपास ७ ते ८ फूट लांबीचे अजगर रस्ता ओलांडताना दिसले. या युवकाने त्याच्या थोडे जवळ जाऊन त्याचे निरीक्षण केले तेव्हा त्याचा लक्षात आले की, हा प्राणी अजगर आहे. त्याने तात्काळ त्याचे फोटो काढले व आपल्या वॉट्सॲप ग्रुप वर टाकले . त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  जाहिरात

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा