नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ‘मेरी माटी मेरा देश अभियान ‘ नेहरू युवा केंद्र कोल्हापूर यांच्याकडून कोल्हापुरात जनजागृती; सावर्डे गावचा युवक गौरव ने प्रत्यक्ष भेटीतून घेतले विविध गावच्या मातीचे नमुने – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

‘मेरी माटी मेरा देश अभियान ‘ नेहरू युवा केंद्र कोल्हापूर यांच्याकडून कोल्हापुरात जनजागृती; सावर्डे गावचा युवक गौरव ने प्रत्यक्ष भेटीतून घेतले विविध गावच्या मातीचे नमुने

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कोल्हापूर ( १३ ऑगस्ट): देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाला निरोप देण्यासाठी मा. प्रधानमंत्री मोदी यांनी देशभरात मेरी माटी मेरा देश या अभियानाची सुरुवात केली आहे. जगभरात वेगवेगळ्या प्रकारे हा उत्सव साजरा केला जात आहे.

राधानगरी तील शेळेवाडी  याठिकाणी अभियाना अंतर्गत भेट देताना गौरव पाटील

या अभियानांतर्गत नेहरू युवा केंद्र आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने राज्यात ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान मुंबई, रत्नागिरी, पुणे, कोल्हपुर, अहमदनगर, परभणी, जालना, सोलापूर, जळगाव, नांदेड, बीड, अमरावती, उस्मानाबाद, लातूर, वर्धा, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, यवतमाळ इत्यादी ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ या राष्ट्रव्यापी अभियानात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो विभागाचा देखील महत्वपूर्ण सहभाग आहे.

ग्रामपंचायत अर्जुनवाडा येथील गौरव पाटील यांनी यशस्वीपणे राबविलेले अभियान

यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रेखावार यांनी नेहरू युवा केंद्र कोल्हापूर कडे सोपवली आहे. या उपक्रमांतर्गत शिलालेख चे लोकार्पण, वृक्षारोपण,शपथविधी, पंचप्राण शपथ घेण्यात येत आहे . विशेष म्हणजे तालुक्यातून जमा केलेली माती कलश मध्ये एकत्रित करून दिल्लीपर्यंत पोहचवण्याचे काम या मोहिमेतून केले जाणार आहे. नेहरू युवा केंद्र जिल्हा युवा अधिकारी मिस. पूजा सैनी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या मोहिमेच्या जनजागृतीचे काम नेहरू युवा केंद्र, कोल्हापूर चे (National youth volunteer) तालुका प्रतिनिधी गौरव दगडू पाटील करत आहेत.

या अभियाना अंतर्गत गौरव पाटील यांनी राधानगरी तील शेळेवाडी, तुरुंबे , अर्जुनवाडा , मालवे, सरवडे, पंडेवाडी, आकनुर,कोल्हापूर, सावर्डे पा. , तळाशी, राधानगरी, फराळे, मांगोली यासारख्या २० गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन जनजागृती केली. त्याच बरोबर तेथील मातीचे नमुने देखील घेतले आहेत.

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा