नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आजादी का अमृत महोत्सव अभियाना अंतर्गत सावर्डे पा. मधील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात झेंडा फडकविण्याचा बहुमान मिळाला शिल्पा मोरे यांना  – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

आजादी का अमृत महोत्सव अभियाना अंतर्गत सावर्डे पा. मधील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात झेंडा फडकविण्याचा बहुमान मिळाला शिल्पा मोरे यांना 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

सावर्डे पा. ( १३ ऑगस्ट ) : आजादी का अमृत महोत्सवाची सांगता मेरी मिट्टी मेरा देश या अभियानांतर्गत देशात गेल्या वर्षी प्रमाणे १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हा अमृत महोत्सव साजरा करण्याचे आदेश मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच दिले आहेत. त्यामुळे देशभरात प्रत्येक शासकीय कार्यालयात ध्वज फडकावून हा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे .

ध्वज फडकविताना मदतनीस सौ. शिल्पा मोरे

राधानगरीतील सावर्डे पाटणकर गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात या अभियाना अंतर्गत रविवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी सकाळी ८:०० वाजता हा अमृत महोत्सव

 

वेगळ्या पद्धतीने पार पाडण्यात आला. यावेळी कार्यक्रमात ध्वज फडकावण्याचा बहुमान याच उपकेंद्रात मदतनीस म्हणून काम पाहणाऱ्या व त्याच गावच्या रहिवासी असणाऱ्या सौ. शिल्पा सागर मोरे यांना मिळाला. गावातील शासकीय कार्यालयात वेगळ्या उपक्रमाला गावकऱ्यांचा देखील चांगलाच प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमासाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पाटील, आरोग्य सेविका मांगले मॅडम, सर्व आशा , गावातील नागरिक तसेच श्री. शिवाजी राव खोराटे विद्यालय सावर्डे पा. मधील सर्व शिक्षक वृंद , शिपाई व विद्यार्थी उपस्थित होते.

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा