नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मृत्युनंतर मुलाने काढली पालखीतून अंतयात्रा ; उंदरवाडीतील तरुणाने ठेवला अनोखा आदर्श  – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

मृत्युनंतर मुलाने काढली पालखीतून अंतयात्रा ; उंदरवाडीतील तरुणाने ठेवला अनोखा आदर्श 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कागल (११ ऑगस्ट) : मुलांनी आई-वडीलांना नाकारल्यामुळे सध्या अनेक वृद्धाश्रम भरत आहेत. गल्लेलठ्ठ पगारदार असणारी कांहीजण आई-वडीलांना पहात नाहीत ही सामाजिक स्थिती आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात एका व्यक्तीने आपल्या आईची सेवा तर केलीच पण मृत्यूनंतरही तिचा सन्मान कायम ठेवल्याचे पहायला मिळाले.

या व्यक्ती आईची सजविलेल्या पालखीतून अंतयात्रा काढत अनोखा आदर्श समोर ठेवला आहे.

कागल तालुक्यातील उंदरवाडी येथील भागीरथी शिवाजी पाटील यांचे वयाच्या ८७ वर्षी गुरुवारी ( दि. १०) सकाळी निधन झाले. या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाने त्यांची सजविलेल्या पालखीतून अंत्ययात्रा काढली. टाळ-मृदंगाच्या साथीने भजन गात गावकरी अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. पाटील यांनी काढलेल्या या अंतयात्रेनंतर कुंटूबियाचे अनोखे मातृप्रेम आचरणात आले आहे.

 

भागीरथी पाटील या कोराना काळापासून सतत आजारी असायच्या. मारुती पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडीलांच्या निधनानंतर पाटील यांच्या सर्व कुटुंबाला आधार दिला. नातेवाईकांच्या उपस्थित काही दिवसांपूर्वी त्यांनी आईच्या पाद्यपूजन कार्यक्रम केला होता. आता मृत्यूनंतर पाटील यांनी आईची अंत्ययात्रा पालखीतून काढली आहे. गुरुवारी (दि. १०) सकाळी त्यांचे निधन झाले. यावेळी पाटील कुटुंबियांनी शोक करण्याऐवजी सजविलेल्या पालखीत त्यांचा मृतदेह ठेवून टाळ-मृदंगाच्या साथीने अंत्ययात्रा काढली. भजनी मंडळे व नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. त्यांच्या पश्चात मुलगा, सरपंच अनिता पाटील, नातवंडे असा परिवार आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा