नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत कोल्हापूर रेल्वे स्टेशनचे रूप पालटणार – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत कोल्हापूर रेल्वे स्टेशनचे रूप पालटणार

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कोल्हापूर (६ऑगस्ट): अमृत ​​भारत स्टेशन योजनेंतर्गत कोल्हापूररेल्वे स्थानकाच्या विकासासाठी 43 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या योजनेतील देशभरातील कामांचे भूमिपूजन उद्या रविवारी (6 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

मध्य रेल्वेचे पुणे विभागीय वाणिज्य प्रबंधक डॉ. रामदास भिसे यांनी याबाबत माहिती दिली आहे. विकास केल्यानंतर कोल्हापूर रेल्वे स्थानकाची झलक कशी असेल याचे फोटोज खासदार धनंजय महाडिक यांनी शेअर केले आहेत.

कोणती कामे केली जाणार?

कोल्हापूर रेल्व स्थानकावर 43 कोटी 3 लाखांच्या निधीतून विकासकामे केली जाणार आहेत. त्यामध्ये स्थानकाचे प्रांगण, तिकीट बुकिंग काउंटर, एटीव्हीएम सुविधा, नव्याने तयार केलेल्या कक्षात विद्यमान बुकिंग काउंटर स्थलांतर, प्रवेश लॉबी, मुख्य प्रवेशद्वार आणि द्वितीय प्रवेशद्वारांवर स्वतंत्र कव्हर पार्किंग, रस्ता रुंदीकरण, लँडस्केपिंग, रस्ता पृष्ठभाग, पादचारी मार्गाचे नूतनीकरण आदी कामांचा समावेश आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. याप्रसंगी रेल्वे प्रबंधक विजय कुमार, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी उपस्थित होते. अमृत ​​भारत स्टेशन योजनेंतर्गत विविध कामांची अंमलबजावणी गती शक्ती युनिटकडे सोपवली आहे. या योजनेंतर्गत पुणे विभागातील विविध विकासकामांना यापूर्वीच मंजुरी देण्यात आली असून, अंमलबजावणीसाठी एजन्सी नेमण्यात येत आहेत. त्यांच्याकडून येत्या वर्षाभरात ही कामे पूर्ण होतील’, असेही डॉ. भिसे यांनी सांगितले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा