नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनावर धडक मोर्चा – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनावर धडक मोर्चा

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

पत्रकार-उत्तम कांबळे केनवडेकर

मुंबई (प्रतिनिधी) – : राज्यातील पत्रकारांवर सातत्याने होणारे हल्ले व राज्यातील पत्रकारांच्या विविध समस्या संदर्भात भारत सरकार नोंदणीकृत बहुउद्देशीय राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर लाक्षणिक उपोषण करून विधानभवनावर धडक मोर्चा काढण्यात आला.

राष्ट्रीय महासचिव रमेश देसाई व प्रदेश अध्यक्ष वैभव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाच्या राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.

आज पर्यत इतर संघटनांच रस्त्यावर उतरून आंदोलन करत होत्या मात्र राज्यातील इतिहासात प्रथमच एखादी बहुउद्देशीय पत्रकार संघटना आपल्या मागण्या संविधानिक मार्गाने पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याने देशभरात हा चर्चेचा विषय ठरत आहे.

इतर देशांच्या तुलनेत लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेला दुय्यम स्थान दिले जाते. निर्भीडपणे पत्रकारिता करणार्‍या पत्रकारांना भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून भादंवि 353 कलमांचा दुरुपयोग करून खोट्या गुन्ह्यात अडकवले जाते. वाळू माफिया, गौण खनिज माफिया अवैध व्यावसायिक भ्रष्ट पुढारी गावगुंड यांच्याकडून प्राणघातक हल्ले केले जातात काही ठिकाणी पोलीस यंत्रणा देखील हप्ते मिळत असल्याने पत्रकारांना संरक्षण देण्या ऐवजी त्यांची पाठराखण करून प्रसार माध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असल्याने राज्यातील पत्रकार सुरक्षित आहे का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. वर्षातील 365 दिवस पत्रकारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या या संघटनेनं राज्यातील 36 जिल्ह्यात आंदोलन सुरू केले आहे. संघटनेचे प्रमुख पदाधिकारी मंत्रालयात धडकला.

राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे

भादंवि कलम 353 मधून पत्रकारांना वगळण्यात यावे व राज्यात ज्या काही पत्रकारांवर 353 व या सारखे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे ते तात्काळ मागे घेण्यात यावे.

 

2) युट्यूब चॅनलला पत्रकारिते मध्ये समाविष्ट करून त्यांची अधिकृत प्रसार माध्यम म्हणून नोंद व्हावी.

 

3) पत्रकार प्रवास करत असलेल्या वाहनांना राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील टोल माफी मिळावी व रेल्वे मध्ये पत्रकारांना मोफत प्रवेश मिळावा.

 

4) विधान परिषदेतुन शिक्षक, पदवीधर आमदारा प्रमाणे राज्यातील नोंदणीकृत पत्रकार संघटनांना विश्वासात घेऊन राज्यपाल नियुक्त पत्रकार आमदारांची निवड करण्यात यावी

 

5)राज्यातील प्रत्येक तालुक्यात पत्रकार वसाहती निर्माण करून पत्रकारांना हक्काचे घरे देण्यात यावे.

6) प्रत्येक तालुक्यात पत्रकार विश्राम गृह, प्रेस कॉन्फरन्स व मीटिंग हॉल व पत्रकार भवन बांधण्यात यावे.

 

7) अधिस्वीकृती नसणार्‍या राज्यातील सर्व पत्रकारांची सरसकट नोंदणी जिल्हा माहिती कार्यालयात करण्यात यावी.

 

8) राज्यातील शासकीय विश्रामगृह व MTDC मध्ये पत्रकारांना प्राधान्याने निशुल्क प्रवेश देण्यात यावा.

 

9)महाराष्ट्रात विविध घटकांसाठी कल्याणकारी महामंडळे आहे याच पध्दतीने पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी पत्रकार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात यावे

 

10) ज्येष्ठ पत्रकारांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा.

 

11) अशासकीय समित्या व शासनाच्या अंतर्गत असलेल्या ट्रस्ट मध्ये पत्रकारांना प्राधान्याने नियुक्ती करण्यात यावे.

 

12) पत्रकार व त्यांचे कुटुंबीयांना शासकीय योजनांचा प्रामुख्याने लाभ मिळण्यात देण्यात यावा.

 

13) पत्रकारांना संबधीत पोलिस ठाण्याकडून पोलीस संरक्षण मिळावे.

 

14) राज्यातील पत्रकारांचा कौटुंबिक आर्थिक सर्वे करण्यात यावा व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल पत्रकारांना व्यवसाय कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे तसेच पत्रकारांना व्यवसायासाठी व निवासासाठी शासकीय भूखंड देण्यात यावा.

 

15) अधिस्वीकृती नसणार्‍या पत्रकारांना देखील शासकीय विमा योजना व पेंशन योजना लागू करावी.

 

16) सतत जनतेच्या सेवेत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांना फ्रंट वर्करचा दर्जा मिळावा.

 

 

17) महानगर पालीका परीवहन सेवेत असलेल्या बसेस मध्ये पञकारांना मोफत प्रवास सवलत मिळावी.

18) समाज कार्य संघाचे वाशीम जिल्हा उपाध्यक्ष श्रीकृष्ण शेटाने यांच्यावर प्राणघातक हल्ला करणार्‍या गाव गुंडांवर कडक कारवाई करावी.

आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

आंदोलनात राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

*चौकट…*

शासनाचे प्रतिनिधी मंत्रालय गृह विभाग उपसचिव मनोज जाधव यांनी संघटनेच्या शिष्टमंडळास चर्चेसाठी मंत्रालयात बोलवले असता सकारात्मक चर्चा झाली. संघटनेच्या मागण्या मान्य करण्याचे शासनाच्या वतीने आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे. अधिवेशन सुरू असल्यामुळे आपल्याला लेखी स्वरूपात आश्वासन न मिळाल्यामुळे आपण काही दिवसांसाठी थांबलेलो आहोत ज्यावेळेस लेखी आश्वासन मिळेल त्यावरती पुढील सूचना लगेच करण्यात येईल. अन्यथा राज्यभरात पुन्हा एकदा लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू करण्यात येईल.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा