नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून सावर्डे पाटणकर गावाला दलीत वस्तीसाठी वीस लाख निधी मंजूर – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून सावर्डे पाटणकर गावाला दलीत वस्तीसाठी वीस लाख निधी मंजूर

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

सावर्डे पा.(०२ ऑगस्ट) : राधानगरी – भुदरगड मतदार संघातील आमदार मा. प्रकाशराव आबिटकर यांनी गेल्या वर्षीच राधानगरी तील काही गावांसाठी दलीत वस्ती सुधार योजनेअंतर्गत चार कोटी निधी मंजूर केला होता. येत्या वर्षात दलीत वस्ती सुधार योजनेअंतर्गत राधानगरी तालुक्यातील  सावर्डे पाटणकर या गावासाठी तब्बल वीस लाख रुपये इतका निधी मंजूर केला आहे.
दोन महिन्यांपूर्वी सावर्डे पाटणकर गावातील कांबळे समाजातील नागरिक व ग्रामपंचायत सदस्य श्री. आनंदा कांबळे , श्री. वसंत शेंडगे त्याचबरोबर गावातील नागरिक स्वप्नील मोरे , सर्जेराव काशिद यांनी सावर्डे पा. गावातील दलीत वस्तीसाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली होती त्याची दखल घेवून चक्क दोन महिन्यातच हा निधी मंजूर केला आहे. सदरचा निधी हा समाजातील बौद्ध विहार बांधण्याच्या कामी खर्च करणेचा असून पुढील एक दोनच महिन्यांत याचे काम सुरू करण्यात येईल अशी माहिती , गावच्या लोकनियुक्त सरपंच श्रीमती सुमन विलास मोरे यांनी दिली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा