नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राधानगरीत लंम्पी आजारचा वाढता प्रभाव ; पशुविभागाचे दुर्लक्ष – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

राधानगरीत लंम्पी आजारचा वाढता प्रभाव ; पशुविभागाचे दुर्लक्ष

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

प्रज्ञावंत ऑनलाईन (०१ ऑगस्ट) : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या १ महिन्यापासून पुन्हा लम्पी रोगाने तोंडवर काढल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान राधानगरी तालुक्यातील राशिवडे गावामध्ये लम्पी रोगामुळे ११ जनावरे दगावली.

पशुविभागाने याकडे गांभिर्याने न घेतल्याने याचा प्रसार जोरदार होत असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे. शासकीय यंत्रणाच तोकडी पडल्याने ही गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.

 

मागच्या आठवड्यात याच गावामध्ये चार दुभत्या गायीचा मृत्यू झाला होता. याबाबत प्रशासनाने गंभीर दखल न घेतल्याने आणखी १२ जनावरांचा जीव गेला आहे. दरम्यान जिल्हा दूध संघ गोकुळकडून गावातील जनावरांचे लसीकरण करण्यात आले. परंतु या लसिकरणाचा जनावरांवर फारसा प्रभाव पडला नव्हता. तर जिल्हा पशुसंवर्धन विभागाने याकडे गांभिर्याने न पाहिल्याने अनेक शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

 

राशिवडे गाव हे राधानगरी तालुक्यातील मोठे गाव असल्याने या गावात जिल्हा परिषद पशुवैद्यकीय दवाखाना आहे. मात्र यंत्रणा कुचकामी असल्याने उपचार वेळेत होत नाहीत. राशिवडे गावासह अन्य गावांमध्ये जनावरांची संख्या विचारात घेता लम्पीरोग आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ विशेष शिबिर घेण्याची गरज आहे. परंतु याकडे संबंधित विभागाकडून गांभीर्याने पाहिले जात नाही अशा तक्रारी शेतकऱ्यांतून पुढे येत आहेत.

 

जनावरे मृत्यूमुखी पडण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आजवर येथील दाजी शामा चौगले, धनाजी आनंदा चौगले, धोंडीराम लहू शिंदे, तानाजी गोविंद परीट, आनंदा वासू नाईक, तानाजी हरी संकपाळ’ संजय शंकर चौगले, बळवंत धोंडी लाड , बळवंत गणपती गोंगाने,रुपेश कानकेकर या शेतकऱ्यांची जनावरे लंपीला बळी पडले आहेत.

 

त्यामध्ये विशेष करून बैल’ दुभत्या गाई आणि कालवडींचा समावेश आहे.जनावरे मृत्यूची संख्या व रोग आटोक्यात आणण्यासाठी युध्दपातळीवर कार्यवाही गरजेची आहे.

 

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा