नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , काळम्मावाडी धरण ६६ टक्के भरले ; गतवर्षीच्या तुलनेत आजस्थितीला पाच टक्के अधिक पाणीसाठा – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

काळम्मावाडी धरण ६६ टक्के भरले ; गतवर्षीच्या तुलनेत आजस्थितीला पाच टक्के अधिक पाणीसाठा

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

राधानगरी ,( ३०जुलै): गेल्या दोन दिवसांपासून राधानगरी तालुक्यामध्ये पावसाची उघडझाप सुरू आहे. दरम्यान, काळम्मावाडी धरण ६६ टक्के भरले असून गतवर्षीच्या तुलनेत पाच टीएमसी अधिक साठा आजस्थितीला झाला आहे. गेल्या वर्षी या धरणामध्ये सहा टीएमसी पाणी शिल्लक होते. यंदा तळ गाठूनही अधिक संचय झाला आहे.

सलगच्या अतिवृष्टीमुळे राधानगरी धरण झपाट्याने भरले. याचे स्वयंचलित दरवाजे खुले झाल्यानंतर पूरस्थिती गंभीर बनत होती. मात्र कालपासून पावसाने उघडझाप सुरू केली आहे. काळम्मावाडी धरण आज ६६ टक्के इतके भरले आहे. १६. ७६ टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाच टीएमसी अधिक पाणीसाठा कमी वेळात झाला आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यापूर्वी या धरणात सहा टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. यंदा धरणाने तळ गाठला होता. गतसलीच्या पावसाची तुलना करता आज रोजी पंधराशे नऊ मिलिमीटर पाऊस गतवर्षी होऊन १७.१४ टीएमसी इतका साठा झाला होता. यंदा आजस्थितीला १६५० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याने गेल्या वर्षीची सरासरी ओलांडली आहे. याचा अर्थ कमी वेळेत गेल्यावर्षी पेक्षाही पाच टीएमसीने अधिक पाणीसाठा काळम्मावाडी धरणामध्ये झाल्याचे दिसते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा