नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राधानगरी धरण ८५ टक्के भरले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

राधानगरी धरण ८५ टक्के भरले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

राधानगरी (२३ जुलै) :राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे धुमशान सुरूच असून धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. आज (दि. २३) धरण 85 टक्के भरले असून पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी सात फूट पाणी कमी आहे.

पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.

रविवारी (दि. २३) सकाळ पर्यंत चोवीस तासात तब्बल 211 मिमी इतका पाऊस झाला. तर दिवसभरात 70 मिमी पाऊस झाला असून जूनपासून आज अखेर 1990 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणात 7083.75 द.ल.घ.फु. इतका पाणी साठा असून पाणी पातळी 340.50 इतकी झाली आहे. खासगी वीजनिर्मितीसाठी धरणातून 1400 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होत असून सध्याची पूर परिस्थिती पाहता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत .

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा