नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , चार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास नागरिकांचा चोप – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

चार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास नागरिकांचा चोप

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

प्रज्ञावंत ऑनलाईन ( २३जुलै):चार वर्षांच्या चिमुरडीच्या असहायतेचा फायदा घेऊन तिचा लैंगिक छळ करणार्‍या नराधमाला चोप देत संतप्त नागरिकांनी लक्ष्मीपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.

आरोपी शैलेंद्र सखाराम पाटील

शैलेंद्र सखाराम पाटील (वय 44, रा.बोळावी, ता. कागल) असे त्याचे नाव आहे. मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांसमोर त्याला हजर केले असता, त्यास 25 जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.

 

पीडित बालिका व तिची आई शहरातील एका पेठेत भाड्याच्या खोलीत राहतात. मुलीचे वडील परगावी असल्याने आई दुकानात काम करीत असते. आई कामावर गेल्यानंतर संशयित शैलेंद्र पाटील हा घरात येत होता. घरी कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने दि. 2 जून ते 17 जुलै 2023 याकाळात वेळोवेळी चिमुरडीचा लैंगिक छळ केला.

 

पीडित मुलीने हा प्रकार आईच्या निदर्शनास आणून दिला. आईने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन पाटील याच्या विरोधात फिर्याद दाखल केली. या प्रकारामुळे परिसरात संतप्त पडसाद उमटले. संतप्त नागरिकांनी शैलेंद्र पाटीलची धुलाई करून पोलिसांच्या हवाली केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा