नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच ; राधानगरी धरण सत्तर टक्के तर काळम्मावाडी धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ     – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच ; राधानगरी धरण सत्तर टक्के तर काळम्मावाडी धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ    

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

राधानगरी(२२ जुलै) : राधानगरी धरणात 70 टक्क्यांच्या घरात पाणीसाठा झाला असून इतर धरणांमध्येही गेल्या चार दिवसांपासून झालेल्या पावसाने पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील प्रमुख 15 प्रकल्पापैकी 3 प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. जिल्ह्यातील राधानगरी, वारणा, कासारी, घटप्रभा, जांबरे आणि कोदे प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु आहे. सर्वाधिक विसर्ग घटप्रभा प्रकल्पातून 5134 क्युसेकने विसर्ग होत आहे.

 

धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाने नद्या आणि धरणांच्या पाणी पातळीत वाढ सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. बंधारे पाण्याखाली गेल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे.

काळम्मावाडी धरणातही चांगली वाढ

गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या पावसाने जिल्ह्याला मोठा दिलासा मिलाला आहे. पिकांना जीवदान मिळाले आहेच, पण धरणांमध्येही पाण्याची वाढ वेगाने होत असल्याने चिंता काहीशी दूर झाली आहे. राधानगरीसह काळम्मावाडी धरणातही वेगाने साठा होत चालला आहे. दोन दिवसांपूर्वी धरणात केवळ 4.55 टीएमसी पाणीसाठा होता. तो आज सकाळपर्यंत 8.62 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा