नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , काळम्मावाडी धरण स्थळावर ६८ मिलिमीटर तर राधानगरी धरणावर १०७ मिलिमीटर पावसाची नोंद – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

काळम्मावाडी धरण स्थळावर ६८ मिलिमीटर तर राधानगरी धरणावर १०७ मिलिमीटर पावसाची नोंद

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

 

राधानगरी( 21जुलै ): तालुक्यात पावसाचा जोर कायम असून, आज तिसऱ्या दिवशीही अतीवृष्टीची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस तुळशी धरण क्षेत्रावर १२८ मिलीमिटर नोंदला आहे. पाणी पातळी वाढ असल्याने राधानगरी धरणातून वीज निर्मितीसाठी सध्या १२०० क्यूसेक पाणी भोगावती नदीपत्रात सुरू आहे. हे धरण ६६ टक्के भरले आहे. येथे आज सकाळी आठ ते सायंकाळी चार पर्यतच्या आठ तासातच १०० मिलीमिटर पाऊस झाला.

सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासात तालुक्यातील तुळशी धरण क्षेत्रावर १२८ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. यामुळे हे धरण १.१७ टीएमसी म्हणजे ३४ टक्के भरले आहे. राधानगरी धरणावर १०७ मिलिमीटर पाऊस झाला असून हे धरण आज सायंकाळी ५.५२ टीएमसी म्हणजे ६६ टक्के भरले आहे.
काळम्मावाडी धरण स्थळावर ६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हे धरण ८ टीएमसी म्हणजे ३१.४७ टक्के भरले आहे. चार वाजेपर्यंत आठ तासात ४५ मिलीमिटर पाऊस झाला. राधानगरी धरणात पाणलोट क्षेत्रातून चार हजार क्यूसेकची आवक असून, वीज निर्मितीसाठी १२०० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. आजही पावसाचा जोर कायम असून धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा