नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राधानगरीतील २८ गावांना भुस्कलनाचा धोका – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

राधानगरीतील २८ गावांना भुस्कलनाचा धोका

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

पावसाचा जोर वाढल्याने किरकोळ पडझडींना सुरुवात झाली आहे. राधानगरी तालुक्यातील सुमारे २८ गावे,वाड्यांना भुस्खलनाचा धोका असुन संबधित कुटुंबियांना तशा सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.२०२१ मध्ये भुस्खलनामुळे तालुक्यातील कुपलेवाडीमधील दोघांना जीव गमवावा लागला होता. तर शिरगावमध्ये मोठे झाड घरावर पडल्याची घटना घडली होती. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासन अलर्ट झाले आहे.

राधानगरी तालुका विशेषत: डोंगराळ आणि दुर्गम भागामध्ये वसलेला आहे. अनेक वाडी, वस्त्या डोंगरांजवळ वसलेल्या आहेत. सध्या पावसाचा जोर वाढल्याने किरकोळ भुस्खलनासह पडझडीचे प्रकार घडत आहेत. दरड कोसळणे, भुस्खलन, जमीन खचणे, रस्ता खचणे आदी विनाशक प्रकार घडत असतात. भुस्खलनामुळे २०२१ मध्ये तालुक्यातील कुपलेवाडीतील दोघांना जीव गमवावा लागला होता. तर शिरगाव येथे भुस्खलनामुळे मोठे झाडच घरात शिरले होते. भुस्खलनामुळे मनुष्यहानी होऊ नये यासाठी प्रशासन अर्लट झाले आहे. संभाव्य भुस्खलन होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणच्या कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सुचना प्रशासनाने दिल्या आहेत.

 

या गावांना धोका

तालुक्यातील कोणोली तर्फ असंडोली, पाटपन्हाळा, गैबीघाट, शिरगाव, सावतवाडी, मानेवाडी, खामकरवाडी, गोतेवाडी, केळोशी बु, केळोशी खु, पाल खुर्द, तळगाव, राई, पडसाळी, माणबेट, चौके, राऊतवाडी, पनोरी, कासाळपुतळे, पालपैकी मोहीतेवाडी, आपटाळ, चोरवाडी, कुराडवाडी, ऐनीपैकी धनगरवाडा, धमालेवाडी, कासारवाडा धनगरवाडा, धामणवाडी पैकी हणबरवाडा, अवचितवाडी, पंडेवाडी, सोळांकुर या गावांना भुस्खलनाचा धोका आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा