नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राधानगरी धरणात 4.55 टीएमसी पाणीसाठा; 700 क्यूसेकने विसर्ग सुरू; पावसाचा जोर कायम – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

राधानगरी धरणात 4.55 टीएमसी पाणीसाठा; 700 क्यूसेकने विसर्ग सुरू; पावसाचा जोर कायम

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

प्रज्ञावंत ऑनलाईन (१९जुलै): राधानगरी  धरण पाणलोट क्षेत्रात व दाजीपूर परिसरात गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे पाणीसाठा 4553.18 द ल घ फूट( 4.55 )टी एम सी पाणीसाठा उपलब्ध आहे, व पाणी पातळी 323.15 फूट इतकी आहे ,या वर्षी जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणाची पाणी पातळी कमी झाली होती, मात्र गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढल्याने पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.

दिवसभरात 67 मी मी इतका पाऊस नोंदला आहे ,तर आजतागायत 1244 मी मी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे, सध्या खाजगी जलविद्युत केंद्रातुन 700 क्यूसेकने विसर्ग सुरू केल्याने भोगावती नदी पात्रात वाढ झाली आहे, त्यामुळे नदी काठच्या लोकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे,

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा