नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कोल्हापूर: पावसाचा जोर वाढला ; जिल्ह्यातील १४ धरणांचा पाण्याचा विसर्ग बंद – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

कोल्हापूर: पावसाचा जोर वाढला ; जिल्ह्यातील १४ धरणांचा पाण्याचा विसर्ग बंद

संग्रहित

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

राधानगरी(१९जुलै) : जिल्ह्यातील राधानगरी, काळम्मावाडी, तुळशीसह बारा धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. धरण क्षेत्रामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे.घटप्रभा धरण शंभर टक्के भरले आहे. घटप्रभा आणि पाटगाव धरण क्षेत्रामध्ये उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. तर वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये निच्चांकी पावसाची नोंद झाली आहे.

पावसाने तब्बल महिनाभर उशीराने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला होता. पाणीबाणीचे भीषण संकट उभे ठाकले असताना वरुणराजाने हजेरी लावली. जिल्ह्यातील प्रमुख धरणे रिकामी झाल्याने चिंता निर्माण झाली होती. आता पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणे भरण्याची आशा निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील राधानगरी, तुळशी, काळम्मावाडी, वारणा, कासारी, कडवी, कुंभी, पाटगाव, चिकोत्रा, चित्री, जंगमहट्टी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे.

 

जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा पुढीलप्रमाणे

 

कंसात चोवीस तासातील पावसाची मिमी मधील नोंद व एकूण पावसाची नोंद

 

राधानगरी ५४ टक्के (६७) १२४४, तुळशी ३० टक्के (४२) ६८६, वारणा ४६ टक्के (२९) ४२१, काळम्मावाडी २२ टक्के (४१) ७९४, कासारी ४७ टक्के (६२) १२९३, कडवी ४८ टक्के (६५) ९७९, कुंभी ५५ टक्के (५५), पाटगाव ४२ टक्के (१४३) २२७२, चिकोत्रा ३१ टक्के (५०) ५३१, चित्री २७ टक्के (८८) ६९४, जंगमहट्टी ३१ टक्के (४०) ४५४, घटप्रभा शंभर टक्के (१४७) १८५३

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा