नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , गैबी घाटातील भीषण अपघातात मिरजेतील तरुण जागीच ठार – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

गैबी घाटातील भीषण अपघातात मिरजेतील तरुण जागीच ठार

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

राधानगरी(१७ जुलै) :राधानगरी- निपाणी राज्यमार्गावरील गैबीघाट ( ता.राधानगरी) येथे हनुमान मंदिरासमोर ट्रक आणि दुचाकीदरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील पाठीमागील सीटवर बसलेला हरिश्चंद्र रणदिवे (वय.२७) (रा.शिंदेवाडी ता.मिरज जि.सांगली ) हा तरुण जागीच ठार झाला असून गाडी चालवणारा त्याच गावातील महेश विलास रणदिवे (वय.३०) हा तरुण जखमी झाला.

जखमींवर ग्रामीण रुग्णालय सोळांकूर येथे प्रथोमोपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले आहे.

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिरज तालुक्यातील शिंदेवाडी येथील आठ ते दहा युवक सोमवारी सकाळी अमावस्यानिमित्त आदमापूर (ता.भुदरगड)येथील बाळूमामाचा दर्शनासाठी निघाले होते. ते दुपारी दोन वाजता बाळुमामांचे दर्शन करुन राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी येथील धबधबा पाहण्यासाठी निघाले असता. यावेळी हे गैबीघाट येथे दोघेजण लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला उभे असताना भरधाव वेगाने चिराची वहातूक करणाऱ्या ट्रकने जोरदार पाठीमागून धडक दिल्यानंतर हरिश्चंद्र रणदिवे याचा जागीच मृत्यू झाला.

तर दुसरा साथीदार महेश रणदिवे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले. रात्री उशिरा शवविच्छेदन करून म्रुतदेह नातेवाईकांच्या देण्यात आला आहे. सदर घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली असून ट्रकचालकाला अटक झाली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ईश्वरा ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा