नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , नितवडे येथे हुल्लडबाजी करणाऱ्या ५२ तरूणांवर कारवाई – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

नितवडे येथे हुल्लडबाजी करणाऱ्या ५२ तरूणांवर कारवाई

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

गारगोटी (१६ जुलै) : धबधब्या पाहण्यासाठी जाणाऱ्या ५२ हुल्लडबाज तरुणां वर कारवाई करण्यात आली. नितवडे (ता. भुदरगड) येथील चौकात भुदरगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी कारवाईचा बडगा उगारला.

पावसाच्या आगमनाने नितवडे-खेडगे येथील धबधबे प्रवाहित झाले आहेत. याबरोबरच वाकीघोलातील तोरस्करवाडीचाही धबधबा प्रवाहित झाला आहे. त्यामुळे या परिसरात पावसाळी पर्यटकांचा लोंढा चांगलाच वाढला आहे. हे धबधबे पाहण्यासाठी जाणाऱ्या ५२ हुल्लडबाज मोटरसायकल तरूणांवर मोटर वाहन कायद्यानुसार पोलिसांनी कारवाई केली.

 

ही कारवाई पोलीस नाईक तानाजी डवरी, पोलीस कॉन्स्टेबल सतीश पाटील, विनायक पाटील, सागर साबणे, धनाजी सुतार, श्रीकांत चौगुले यांनी केली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा