नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राधानगरीतील धरणातील पाणी पातळी पन्नास टक्के ; धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

राधानगरीतील धरणातील पाणी पातळी पन्नास टक्के ; धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच असून धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरण ५० टक्के भरले आहे. रविवारी (दि.१६) सकाळी संपलेल्या दहा तासांत ५५ मिमी इतका पाऊस झाला

धरणक्षेत्रात जूनपासून आजअखेर १०९९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणात ४१०९.१४ दलघफू इतका पाणी साठा असून पाणी पातळी ३१९.२८ इतकी झाली आहे. दरम्यान, दमदार पडणाऱ्या पावसामुळे बळीराजा भात रोप लावणीत व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे.

 

चालू वर्षी पावसाने उशीरा हजेरी लावली आहे. जून महिना कोरडाच गेला असताना जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. परंतु, जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने समाधानकारक हजेरी लावली. पावसाच्या विलंबामुळे राधानगरी धरणाने तळ गाठला होता. परंतु, जुलै महिन्यांमध्ये पडणाऱ्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. ८. ३६१ टीएमसी क्षमतेच्या राधानगरी धरणामध्ये गतवर्षी ५. ६५ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. हा साठा आजअखेर ४.११ टी. एम. सी इतका झाला आहे. तर गतवर्षी १८०९ मिमी पावसाची नोंद झाली होती. आजअखेर १०९९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा