नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण खातं; सतेज पाटलांना खासगीत दिली मोठी ऑफर, चर्चांना उधाण – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण खातं; सतेज पाटलांना खासगीत दिली मोठी ऑफर, चर्चांना उधाण

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कोल्हापूर/उत्तम कांबळे केनवडेकर.

राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं आहे. आणि त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांना मोठं खातं मिळालं आहे. मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण हे महत्त्वाचं खातं मिळालं आहे. खातेवाटपाची चर्चा असताना दुसरीकडे हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांना दिलेली खुली ऑफर चर्चेत आली आहे. स्वतः हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटलांना दिलेल्या ऑफरच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. खासगीत त्यांना सोबत येण्याचं निमंत्रण दिलं असल्याचं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. शिवाय सोबत आला तर सर्व निवडणुकीत मित्र राहू असंही ते म्हणाले.कोल्हापूरच्या राजकारणातील जय वीरूची जोडी म्हणून आमदार सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्याकडे पाहिलं जातं. दोघांनी एकमेकांच्या साथीने मिळून कोल्हापूरच्या राजकारणावर वर्चस्व ठेवलं आहे.

गोकुळ जिल्हा बँक यासह महानगरपालिकेत आमदार हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची सत्ता आहे.कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात गेली दीड दशक मित्र असलेले काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात राज्यामध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर काहीसा दुरावा निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखालील एक गट थेट सत्तेत सहभागी झाला. आता अजित पवारांसोबत मंत्रीपदाची शपथ घेतलेले राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी काँग्रेसचे नेते सतेज पाटील हे मित्र रहावेत यासाठी त्यांना खासगीत आमच्या सोबत येण्याची ऑफर दिल्याचं जाहीर केलं आहे.आगामी विधानसभा, लोकसभा, महानगरपालिका, जिल्हापरिषद निवडणुकीत सतेज पाटीलसोबत आले तर मित्र राहू, असं मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची विचारधारा एकच आहे त्यामुळे ते आमच्यासोबत आले तर विचारधारा एकच असेल. म्हणून मी त्यांना खासगीत आमच्या सोबत येण्याची खुली ऑफर दिल्याचं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा