नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुडाळचा विराज राज्यात दुसरा – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुडाळचा विराज राज्यात दुसरा

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

   गुडाळ प्रतिनिधी : राधानगरी तालुक्यातील केंद्रशाळा गुडाळचा विद्यार्थ्याने महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात दुसरा येत मोठे यश मिळवले आहे.

   विराजराजे विजयसिंह मोहिते असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. 96 टक्के गुण मिळवून त्याने हे यश मिळवले आहे.

विराजराजे हा गुडाळवाडी येथील विजयसिंह मोहिते यांचा सुपुत्र आहे .त्याला गणेश पाटील, शाहू चौगले ,विक्रम पाटील, प्रमोद पाटील, विक्रम वागरे, नंदिनी शेलार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. विराजराजे याची नुकतीच नवोदय विद्यालयातही निवड झाली असून सध्या तो कागल येथील नवोदय विद्यालयात शिकत आहे. गुरुवारी सायंकाळी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात दुसरा आल्याचे वृत्त कळताच गुडाळवाडी ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा केला .विराजराजे आणि त्याच्या आई-वडिलांचे अभिनंदन करण्यासाठी त्याच्या घरी ग्रामस्थांची रीघ लागली होती.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा