नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पॉलिशच्या बहाण्याने दीड तोळे सोने लंपास; राधानगरी तालुक्यातील घटना – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

पॉलिशच्या बहाण्याने दीड तोळे सोने लंपास; राधानगरी तालुक्यातील घटना

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

 

प्रज्ञावंत वृतसेवा : सोने पॉलिश करण्याच्या बहाण्याने सोने केमिकलमध्ये विरघळून ६४ हजारांचे सोने लंपास करण्याची घटना चांदे (ता.राधानगरी) येथे घडली. याबाबत वंदना दिनकर भिसे (वय ३८) यांनी अज्ञातांविरुध्द राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे

 

या घटनेमुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, चांदे येथे २५ ते ३० वयोगटातील हिंदीमध्ये व मराठीत अडखळत बोलणारा तरुण सोने पॉलिश करण्यासाठी आला होता. येथील वंदना दिनकर भिसे यांनी आपल्या साडेतीन तोळ्याच्या पाटल्या पॉलिशसाठी त्याच्याकडे दिल्या. त्या भामट्याने पाटल्या केमिकलमध्ये घातल्या, त्यानंतर पॉलिश केल्या असे सांगत भिसे यांच्याकडे देऊन निघून गेला. दिलेल्या पाटल्याच्या वजनाबाबत वंदना यांना शंका आली. त्यांनी पाटल्याचे वजन केले असता यामधील दीड तोळे सोने वितळवून घेतल्याचे समोर आले. त्यानंतर याबाबत संगिता यांनी अज्ञात व्यक्तिच्या विरोधात राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पो.नि. ईश्वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.रानगे या करत आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा