नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कोल्हापूर मधील पावसाचा जोर कमी झाल्याने नदीतील पाणीसाठ्यात पुन्हा घट – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

कोल्हापूर मधील पावसाचा जोर कमी झाल्याने नदीतील पाणीसाठ्यात पुन्हा घट

संग्रहित

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर  ऊन-पावसाचा खेळ सुरु असून उष्माही प्रचंड वाढला आहे. पावसाने ओढ दिल्याने राधानगरी धरणातून  सुरु असलेल्या ७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग पूर्णत: बंद केला आहे.त्यामुळे, पंचगंगेसह इतर नद्यांच्या पाणी पातळी झपाट्याने घट होत आहे.

संग्रहित                                                                                   कसबा बावडा येथील राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पाणी पातळी १४ फुटांपर्यंत खाली गेली आहे. तर, जिल्ह्यातील एकही बंधारा सध्या पाण्याखाली नाही. गावागावांत होणाऱ्या पावसाळी जत्रांमध्ये ग्रामदैवताकडे जोरदार पावसाची मागणी आणि नवस केले जात आहेत.जिल्ह्यात पावसाने दिलेल्या ओढीमुळे धरणातील पाणीसाठा गतीने होत नाही. राधानगरीसह वारणा, दुधगंगा धरणातील पाणीसाठा वाढलेला नाही. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी राधानगरी धरणात ४.५० टीएमसी पाणीसाठा होता.

काळम्मावाडी धरणात १२ टीएसमी व वारणा धरणात १८ पाणीसाठा होता. आज मात्र तिपटीने कमी पाणीसाठा कमी आहे. उद्यापासून सोमवारपर्यंत चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे जोरदार पावसाची अजूनही प्रतीक्षा असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

जिल्ह्यातील धरणांमधील आजचा पाणीसाठा

धरण एकूण क्षमता आजचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

राधानगरी ८.३६ ३.४९

तुळशी ३.४७ ०.९६

वारणा ३४.३९ १४.१७

दूधगंगा २५.३९ ४.२०

कासारी २.७७ ०.९९

कडवी २.५१ १.०३

कुंभी २.७१ १.३१

पाटगाव ३.७१ १.३९

चिकोत्रा १.५२ ०.४५

चित्री १.८८ ०.४३

जंगमहट्टी १.२२ ०.३५

घटप्रभा १.५६ १.५०

जांबरे ०.८१ ०.५०

आंबेओहोळ १.२४ ०.४०

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा