नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सावर्डे पा. गावातील रस्त्या देत आहे अपघातास निमंत्रण ; तरीही स्थानिक प्रशासनाचा याकडे कानाडोळा    – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

सावर्डे पा. गावातील रस्त्या देत आहे अपघातास निमंत्रण ; तरीही स्थानिक प्रशासनाचा याकडे कानाडोळा   

रस्त्याच्या बाजूस वळणावर अशाप्रकारे भगदाड पडलेले आहे

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
सावर्डे पा. : राधानगरी तील सावर्डे पाटणकर या गावातील मुख्य रस्त्याला (सुळंबी रोड) जोडला जाणारा एक रस्ता गावातील चर्मकार समाज व सम्राट अशोक नगर गल्ली नंबर १ इथून सुरू होऊन गावच्या वेशीवर म्हणजेच सम्राट अशोक गल्ली नंबर २ या ठिकाणी मुख्य रस्त्याला येऊन मिळतो. गावातील लोकांसाठी हा महत्त्वाचा मार्ग असल्याने गावातील बहुतांशी लोक याच रस्त्याने ये – जा करत असतात ; परंतु गावातील हा रस्ता दोन महिन्यापूर्वी अवजड वाहनाचा दाब पडून खचला आहे.
रस्त्याच्या बाजूस वळणावर अशाप्रकारे भगदाड पडलेले आहे
हा रस्ता सम्राट अशोक नगर गल्ली नंबर १ मधून येऊन सरळ पुढे येऊन गावच्या वेशीवर म्हणजे सम्राट अशोक नगर गल्ली नंबर २ येथे मुख्य रस्त्याला मिळतो तरी या रस्त्याच्या मध्यावर एक वळण लागत असून त्या ठिकाणी गावातील सांडपाणी ओढ्याकडे जाण्यासाठी रस्त्यातून एक सिमेंट चा नळा घातलेला आहे. या रस्त्यातून गावात प्रवेश करताना उजव्या बाजूस अवजड वाहनाच्या दाबामुळे एक भगदाड पडले आहे. जरी आता ही बाब चिंताजनक नसली तरी भविष्यात मात्र या ठिकाणी मोठा अपघात होण्याचे संकेत स्पष्ट दिसत आहेत.
रस्त्याचे वळण व रस्त्याची झालेली दुरवस्था
गावातील लोकांचा याच मार्गाने प्रवास होत असून रात्री अपरात्री हे भगदाड स्पष्ट दिसून येत नसल्याने अनोळखी व्यक्तीसाठी हा मार्ग निश्चितच जीवघेणा ठरेल. सदरचा रस्ता हा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील असून देखील आजअखेर याची दुरुस्ती झाली नाही. कदाचित एखादी दुर्घटना घडल्या वरच ग्रामपंचायतीला जाग येणार की काय ? असा प्रश्न आता इथल्या गावच्या स्थानिक लोकांना पडलेला आहे. त्यामुळे रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये म्हणून अगोदरच खबरदारी घेतलेली बरी.म्हणून लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी इथल्या लोकांची मागणी आहे.

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा