नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , खेकड्याच्या निर्यातीतून वर्षाकाठी पाच कोटीचा व्यवसाय करणारी पहिली पास गुना मावशी – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

खेकड्याच्या निर्यातीतून वर्षाकाठी पाच कोटीचा व्यवसाय करणारी पहिली पास गुना मावशी

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
बातमीदार/मुंबई
१ ली पास पण आज ६० वर्षाच्या गुणाबाई सुतार वर्षाला करतात ५ कोटी व्यापार ..
मित्रानो ..आज कोणताही व्यवसाय करण्यासाठी M.B.A. होण्याचीच गरज नाही त्यासाठी
हवी एक जिद्द ,उर्मी ,,,हो आपण ही काही करू शकतो . मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर आपण शुन्यातून विश्व निर्माण करू शकतो हे दाखवून दिलंय नवी मुंबईतल्या गुणाबाई सुतार या महिलेनं…महाराष्ट्र हे देशात सर्वात जास्त नैसर्गिकरित्या खेकड्यांचे उत्पादन करणारं राज्य आहे. याचाच फायदा घेत गुणाबाईंनी खेकड्यांची निर्यात करत परदेशातील बाजारपेठ गाठली आहे.

या आहेत नवी मुंबईतील वाशी गावात राहणार्‍या गुणाबाई…शिक्षण फक्त पहिली…पण वयाच्या 8 व्या वर्षांपासून खेकडे पकडण्यात त्या अगदी पारंगत .कारण ते सोपे काम नसते गेल्या ४० वर्षापासून गुणाबाई नवी मुंबईतील खाडी किनार्‍यावर फळीवरुन खेकडे पकडून मुंबईत विकायच्या…सुरुवातीला सव्वा रूपयात एक डझन खेकडे विकणारी गुणाबाई आज वर्षांकाठी 5 कोटी रुपयांची खेकड्यांची निर्यांत करते. विशेष म्हणजे वडील पती भावंड या कोणाची साथ नसताना ही मजल गुणाबाईने गाठलीये.आज गुणाबाई 100 ग्रँमचे कच्चे खेकडे घेवून तीन किलोचे पक्के खेकडे तयार करते. तेव्हा त्यांना एका किलो मागे 30 डॉलर मिळतात.
नवी मुंबईतील खाडी किनार्‍यालगत असलेल्या तलावात गुणाबाई राज्यभरातील कच्चे खेकडे सोडून पारंपरिक पद्धती हा व्यवसाय करतात. यातून त्यांना 4 महिन्यात अडीच ते तीन किलोचे पक्के खेकडे मिळतात आणि नंतर याच खेकड्यांवर स्वत:च्या कोल्डस्टोरेजमध्ये प्रक्रिया करून निर्यात केली जाते. महाराष्ट्रातला 100 टन खेकड्याचा कच्चा माल आंध्रप्रदेशात जात होता. आणि तिथे खेकडे पक्के करून चेन्नई मार्गे निर्यात होत होती. पण आता या पैकी 70 ते 80 टन खेकडा गुणाबाई आणि तिचा मुलगा सुभाष निर्यात करतात.
आज आपल्या सर्व किनारपट्टीवर खेकड्यांच्या उत्पादनाला पोषक वातावरण आहे. नवी मुंबईतील पाचशे तलावांची एमपेडाच्या माध्यमातून पाहणी झालीये. या सर्व तलावातून शेकडो टन खेकड्याच उत्पादन होवू शकतो. जर महाराष्ट्र सरकारने तामिळनाडू सरकार प्रमाणे सुविधा दिल्यातर महाराष्ट्र खेकडे निर्यातीमध्ये अव्वल स्थानी असेल. कारणं परदेशात महाराष्ट्रातल्या खेकड्यांना मागणी आहे. यामुळे राज्यातील तरुणांना रोजगारही नवीन संधी उपलब्ध होईल

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा