नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सावर्डे पा. गावी निघाली बाल वारकऱ्यांची पायी दिंडी – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

सावर्डे पा. गावी निघाली बाल वारकऱ्यांची पायी दिंडी

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

सावर्डे पा.(दिनांक २९ जून) : आषाढी एकादशी निमित्य राधानगरीतील सावर्डे पाटणकर गावात अंगणवाडी तील बालवारकऱ्यांची पायी दिंडी काढण्यात आली. आषाढी एकादशी निमित्त ही दिंडी काढण्यात आली असून या दिंडीत अंगणवाडीतील सर्व मुले वारकरी पोशाखात दिसत होती. ही दिंडी सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास निघाली असून संपूर्ण गावाची प्रदक्षिणा पूर्ण करून या दिंडीचा समारोप झाला .

वारकरी पोषाख हा या दिंडीचे खास आकर्षण बनला असून गावातील लोकांना खऱ्या खुऱ्या वारकरी दिंडीचे दर्शन पहावयास मिळाले. त्यामुळे या दिंडीला लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. या दिंडीमध्ये लहान मुलांबरोबर अंगणवाडीतील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस हेमा गुरव ,विमल तोवर,आनंदी शेंडगे, संगीता शिंदे, संगिता कांबळे, क्रांती सोनगेकर,भारती सुतार, मनीषा सुतार इ. मंडळींचा सहभाग होता.

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा