नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आषाढी वारी निमित्त केनवडे येथील केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थिनींची पायी दिंडी – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

आषाढी वारी निमित्त केनवडे येथील केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थिनींची पायी दिंडी

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

पत्रकार -उत्तम कांबळे केनवडेकर

आज आषाढी एकादशी निमित्त केंद्र शाळा केनवडे शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने दिडी काढली.दिंडी मध्ये अंगणवाडी पासून ते सातवी पर्यंतच्या सर्व मुला- मुलींना रुक्मिणी,पांडुरंग व वारकरी अशी वेशभूषा परिधान करून टाळ मृदंगाच्या तालावर बोला पुंडलिक वरदाच्या नाम गजरात तल्लीन होऊन या चिमुकल्यांनी विठुरायाचा नामाचा जागर केला. ग्राम प्रदक्षिणा पुर्ण झाल्यावर सर्व बाल वारकरी विठ्ठल मंदिरात पांडुरंगाच्या दर्शनासाठी पोहचले. सर्व बाल वारकरी यांनी विठ्ठल – रुक्मिणी चे मनोभावे दर्शन घेतले. पांडुरंगा सर्वत्र पाऊस पाडून माझ्या शेतकरी राजाला सुखी करण्याची तसेच धरणी मातेला हिरवा शालू नेसवण्याची विठुरायाला चरणी प्राथर्ना केली व बळीराजाला सुखी ठेव असे साकडे घातले.

दिंडीमध्ये सहभागी झालेले अंगणवाडीतील बाल वारकरी

सर्व वारकऱ्यांच्या समवेत रिंगण सोहळा पार पडला त्यामध्ये मुलींनी फुगडी, घोडा खेळाचा आनंद लुटला. या दिंडी सोहळयात सर्व गावातील वारकरी, शिक्षक स्टाफ व अंगणवाडी सेविका या सर्वांनी बाल वारकऱ्यांच्या समवेत सहभागी होऊन दिंडीचा आनंद लुटला.

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा