नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , म्हाकवे येथे वरातीला टाळ मृदुंगाचा ताल आणि विठ्ठल नामाचा जयघोष ! – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

म्हाकवे येथे वरातीला टाळ मृदुंगाचा ताल आणि विठ्ठल नामाचा जयघोष !

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

पत्रकार-उत्तम कांबळे केनवडेकर

आजच्या बदलत्या जमान्यात लग्न म्हटलं की भरपूर प्रमाणात पैसा खर्च होतो, त्यामध्ये वरात डिजे,दारू व चित्रविचित्र नाचणे हे प्रकार सर्रास घडत असतात . या प्रकारामुळे तरुणाई अक्षरशः बिघडत चालली आहे. पण हे सर्व प्रकार बाजूला ठेवून लग्नामध्ये वारकरी पद्धतीने वरात तुम्ही कधी पाहिली आहे का? हो पण हे असे घडले आहे कागल तालुक्यातील म्हाकवे या गावामध्ये.


दि .२७/६/२०२३ रोजी म्हाकवे गावातील शुभम मंडप डेकोरेटर्स चे प्रोप्रायटर श्री सुखदेव पाटील यांचे चिरंजीव श्री शुभम सुखदेव पाटील यांच्या लग्नाच्या वरातीत तुरंबे येथील वारकरी शिक्षण संस्थेतील मुलांना निमंत्रित करून आध्यात्मिक स्वरूपाची वरात काढण्यात आली. वराती मधील विठोबा रखुमाई नामाच्या ठेक्यावरील टाळ आणि मृदंगाचा गजर डीजे पेक्षाही वरातीतील सहभागी लोकांना मंत्रमुग्ध करणारा होता. असा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्ह्यात पहिल्यांदाच पाहायला मिळाला, या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी घेतलेला हा नावीन्यपूर्ण निर्णय सध्याच्या तरुणाईसाठी निश्चितच आदर्श असा आहे

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा