नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

बातमीदार/२८जून
भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद
यांच्यावर काही अज्ञात लोकांनी उत्तर प्रदेशातील सहारनपूर
येथे गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात आझाद जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी स्थानिक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे….

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर आझाद हे त्यांच्या फॉर्च्यूनर कारने देवबंद दौऱ्यावर निघाले होते. यावेळी ते देवबंदजवळ पोहोचले असता अचानक काही अज्ञातांनी त्यांच्या कारवर गोळीबार केला. यातील एक गोळी त्यांच्या बरगडीला चाटून गेली असून त्यांच्या कारवर अनेक गोळ्यांचे ठसे दिसत आहे. तर कारच्या सगळ्या काचा देखील फुटल्या आहेत
तसेच या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी याप्रकरणी वेगाने तपास सुरू केला आहे. तसेच हा हल्ला नेमका कोणी केला हे अद्याप समजू शकलेले नसून हल्लेखोर गोळ्या झाडून पसार झाले आहेत. तर प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हल्लेखोर ज्या कारने आले होते त्या कारचा नंबर हरियाणात नोंदणीकृत आहे. हल्लेखोर पळून जाऊ नयेत यासाठी पोलिसांनी देवबंदसह सहारनपूर परिसरात अनेक ठिकाणी नाका बंदी केली आहे. यासोबतच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जात आहे.


दरम्यान, हल्ला झाल्यानंतर चंद्रशेखर आझाद यांनी म्हटले की, गोळीबार झाला तेव्हा माझ्यासोबत काहीजण होते. गोळीबारानंतर स्थानिक पोलिसांकडे मदतीसाठी संपर्क साधला. हल्लेखोरांबाबत आता व्यवस्थित आठवत नाही. मात्र, माझ्यासोबत असणारे कार्यकर्ते त्यांना ओळखू शकतील. गोळीबारानंतर हल्लेखोरांची कार सहारनपूरच्या दिशेने गेली. तर, आमच्या कारने यु-टर्न घेतला. हल्ला झाला तेव्हा माझ्या लहान भावासोबत आम्ही पाचजण कारमध्ये होतो. तसेच आमच्या सहकारी डॉक्टरांना देखील गोळी लागली आहे, असे त्यांनी सांगितले

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा