नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या राऊतवाडी धबधब्यावर आता आकारले जाणार गाड्यांसाठी प्रवेश शुल्क – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या राऊतवाडी धबधब्यावर आता आकारले जाणार गाड्यांसाठी प्रवेश शुल्क

संग्रहित फोटो

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

राधानगरी : पावसाचा हळूहळू जोर वाढू लागल्याने पर्यटकांचे आकर्षण असलेला राऊतवाडी धबधबा आता हळूहळू प्रवाहित होत आहे

संग्रहित फोटो

पूर्ण क्षमतेने कोसळण्यासाठी अद्याप मोठ्या पावसाची गरज आहे. असे असले तरी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी येथील परिस्थितीकी विकास समितीने येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्यांसाठी प्रवेश शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील जवळचा आणि सहज सोपा धबधबा म्हणून अलिकडे राऊतवाडी धबधबा प्रसिध्दीस आला आहे. राधानगरी धरणाच्या बाजूला असलेल्या आकर्षक धबधब्यावर नव्यानेच सुधारणा व आकर्षक नाविन्यपूर्ण आकार देऊन सुशोभीकरण केले आहे. यामुळे पर्यटकांची गर्दी दिवसागणिक वाढतच आहे. यंदाच्या हंगामातील पावसाला नुकताच प्रारंभ झाल्याने हळूहळू हा धबधबा प्रवाहित होऊ लागला आहे. मात्र पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.
येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येचा विचार करून येथील परिस्थितीकी विकास समितीने पर्यटकांकडून प्रति गाडी वाहन आकारानुसार प्रवेश शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. यातून येथील बेरोजगारांना काम व गावातील सुधारणांचे नियोजन केले जाते. शनिवार-रविवारी गर्दीचा विचार करून गाड्यांची पार्किंग व सुव्यवस्था राखण्यासाठी आणखी नियोजन केले जाणार आहे. यानंतर प्रति गाडी शुल्क निश्चित करण्याचे धोरण अवलंबले जाईल.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा