नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , न्या.रानडे विदयालय कापशी यांची ग्रीन स्कूल घ्या दिशेने – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

न्या.रानडे विदयालय कापशी यांची ग्रीन स्कूल घ्या दिशेने

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कोल्हापूर/उत्तम कांबळे केनवडेकर : किशोर मुसळे चॅरीटेबल ट्रस्ट ची मोठी मदत शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचालित न्या. रानडे विद्यालय व ज्युनि. कॉलेज कापशी सेनापती या शाळेत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आंबा , साग, चिंच, जांभळ, सिताफळ, पेरु, मोगरा ,बांबू इ. १३००० वृक्ष प्रदान करण्यात आले. तसेच वृक्षारोपन, ग्रीन स्कूल, शाळेला डिजिटल प्रिंटिंग द्वारे सुशोभीकरण करण्यात आले. उदघाटन व शुभारंभ करण्यात आला . अध्यक्ष स्थानी किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्ट मुबईचे प्रमुख डॉ . विवेकानंद सावंत होते. आपल्या मनोगता मध्ये किशोर मुसळे ट्रस्ट सामाजिक’ शैक्षणिक उपक्रमात नेहमी अग्रेसर असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ग्रीन स्कूल ही संकल्पना घेऊन ट्रस्ट वाटचाल करत असल्याचे सांगितले तसेच मुलांना वृक्षारोपणाचे महत्व पटवून देऊन वृक्ष लागवड करण्याचे आवाहन केले . यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण तसेच पर्यावरण पूरक चित्रकला स्पर्धक मुलांचा ट्रॉफी, प्रमाणपत्र व सर्व विद्यार्थ्यांना वह्या देऊन ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला . शाळेच्या शैक्षणिक जडणघडणीत व पर्यावरण संतुलन राखणे करिता पत्रकारांचा मोठाा वाटा असतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेचे पदाधिकारी बाळ डेळेकर सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दैनिक तरुण भारतचे सदाशिव आंबोसे , लोकमतचे शशिकांत भोसले पुण्यनगरी चे अवधूत आठवले उपस्थित होते . या ट्रस्ट च्या माध्यमातून १९९६-९७ च्या बॅचचा माजी विद्यार्थी व प्रेमकुमार हुबळे ( डेपोटी मॅनेजर ) व त्यांच्या पत्नी सौ. सारिका हुबळे ( आर्ट टीचर ) यांनी शाळेला डिजिटल प्रिंटिंग द्वारे सुशोभीकरण करण्याकरिता अंदाजे 3 लाख रुपये खर्च करून हातभार लावला.

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा