नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , 15 ऑगस्टला तिरंगा फडकवणार नाही; संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

15 ऑगस्टला तिरंगा फडकवणार नाही; संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

पुणे/बातमीदार

संभाजी भिडेंच्या वक्तव्यामुळं नवा वाद निर्माण होणार आहे. 15 ऑगस्टला तिरंगा फडकवणार नाही, भारताचं राष्ट्रगीत म्हणणार नाही अशी वादग्रस्त घोषणा भिडेंनी केली आहे.

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एका वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. 15 ऑगस्ट आणि २६ जानेवारी तिरंगा फडकवणार नाही तर राष्ट्रगीतही म्हणणार नसल्याचं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे कारण संभाजी भिडे यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले संभाजी भिडे 

येत्या 15 ऑगस्टला तिरंगा फडकवणार नाही. 26 जानेवारीलाही तिरंग्याला मानवंदना देणार नाही, असा निर्णय भिडेंनी जाहीर केलाय. तिरंगा फडकवायचा नाही, राष्ट्रगीत देखील म्हणायचं नाही, असं आवाहन देखील संभाजी भिडे यांनी केले आहे. हिंदवी स्वराज्यासाठी येत्या 15 ऑगस्टला गोवा ते गोंदिया आणि कोल्हापूर ते डांग अशी स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढण्याची घोषणाही संभाजी भिडे यांनी केली आहे. पुण्यातील दिघी येथे जाहीर व्याख्यान देताना संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले.

 

तिरंगा फडकवणार नाही अस संभाजी भिडे का म्हणाले?

15 ऑगस्ट या दिवशी भारताची फाळणी झाली. त्यामुळे 15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस असूच शकत नाही असे संभाजी भिडे म्हणाले. या दिवशी देशाची फाळणी झाली असल्यामुळे स्वातंत्र्य दिन साजरा करण्याऐवजी सर्वांनी उपवास कारावा आणि दुखवटा पाळावा. जन गण मन हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही असा दावा देखील संभाजी भिडे यांनी केला आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी जन गण मन हे गीत 1898 ला इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी लिहले होते असे संभाजी भिडे म्हणाले.

 

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यास संभाजी भिडे यांचा विरोध

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यास शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी विरोध केला होता. ‘समुद्रात स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नका, अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकारला सुनावले होते. शिवाजी महाराजांची जयंती हिंदू पंचांगाच्या तिथीनुसारच साजरी झाली पाहिजे, असंही त्यांनी बजावले होते

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा