नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , केनवडे ग्रामपंचायत मध्ये छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

केनवडे ग्रामपंचायत मध्ये छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी

राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करताना ग्रा. पं. केनवडे तील सरपंच व सदस्य

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

केनवडे /दि २६/६/२०२३.

आरक्षणाचे जनक व शोषित पीडितांचे कैवारी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती केनवडे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये साजरी झाली.

राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करताना ग्रा. पं. केनवडे तील सरपंच व सदस्य

त्यांनी त्यांच्या संस्थानिकात सर्व जाती-धर्माची मुले सुशिक्षित व शिक्षित झाली पाहिजे यासाठी अविरत प्रयत्न केले, प्रत्येक जातीचे वस्तीगृह त्यांनी निर्माण केले व जे शिक्षणापासून वंचित होते त्यांना शिक्षण मिळवून द्यायचा खऱ्या अर्थाने पाया शाहू महाराजांनी घातला. जातीयतेची विषवल्ली त्यांनी मुळापासून संपवून समानतेची वागणूक सर्वांना दिली. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे हे पहिले राजे होते. अशी दूरदृष्टी असणारे छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य अतिशय महान आहे.

या जयंतीप्रसंगी केनवडे गावच्या विद्यमान सरपंच सौ.अनुराधा शिंदे , महादेव मगदूम, सचिन पाटील, शिवाजी पाटिल, पांडुरंग शेणवी, नामदेव सुतार, शशिकांत शिंदे व ग्रामस्त उपस्थित होते

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा