नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जिल्ह्यात धरण क्षेत्रात दमदार ;परंतु शहरात तुरळक पाऊस – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

जिल्ह्यात धरण क्षेत्रात दमदार ;परंतु शहरात तुरळक पाऊस

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

प्रज्ञावंत ऑनलाईन :जिल्ह्यात धरण क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासांत रविवारी सकाळी आठपर्यंत आठ धरणांच्या परिसरात अतिवृष्टी झाली.जोरदार पावसाने धरणांत पाण्याची आवक सुरू झाली आहे. यामुळे पाणीसाठ्यात वाढ सुरू झाली आहे. शहर आणि परिसरात मात्र दिवसभर तुरळक पाऊस झाला.

 

जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी शहर आणि परिसरात त्याचा जोर ओसरला. मात्र, जिल्ह्याच्या पश्चिम भागात, विशेषत: धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम होता. रविवारी सकाळी आठपर्यंत गेल्या 24 तासांत प्रमुख 15 पैकी 8 धरण क्षेत्रांत अतिवृष्टीची नोंद झाली होती. राधानगरी धरणाच्या परिसरात 80 मि.मी. तर दूधगंगा परिसरात 70 मि.मी. पाऊस झाला. पाटगाव धरण परिसरात सर्वाधिक 152 मि.मी., कुंभी परिसरात 87 मि.मी., कासारी परिसरात 83 मि.मी. तर कोदे परिसरात 72 मि.मी. पाऊस झाला. घटप्रभा धरण क्षेत्रात 90 मि.मी. तर जांबरे प्रकल्पात 66 मि.मी. पावसाची नोंद झाली. यासह तुळशी (30), वारणा (10), चित्री (32), कडवी (42), चिकोत्रा (30), जंगमहट्टी (40) व आंबेओहळ (15) या परिसरातच पाऊस झाला.

धरणात पाण्याची आवक सुरू

धरण क्षेत्रात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. राधानगरी आणि दूधगंगा धरणात पाणी येऊ लागले आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ सुरू झाली आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता राधानगरी धरणात 1.57 टीएमसी पाणीसाठा होता. दिवसभरात धरणात 47 एमसीएफटी पाणी आले. यामुळे रविवारी सकाळी आठ वाजता धरणाचा पाणीसाठा 1.62 टीएमसी इतका झाला. दूधगंगा धरणात शनिवारी सकाळी 1.17 टीएमसी पाणी होते. दिवसभरात धरणात 58 एमसीएफटी पाणी आले. यामुळे रविवारी सकाळी हा पाणीसाठा 1.23 टीएमसी इतका झाला.

जिल्ह्यात रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या 24 तासात सरासरी 19 मि.मी. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात 59 मि.मी. इतका झाला. भुदरगडमध्ये 41, राधानगरीत 39, आजर्‍यात 33, शाहूवाडीत 28, चंदगडमध्ये 27, पन्हाळ्यात 11, गडहिंग्लजमध्ये 10, करवीरमध्ये 8.1, शिरोळमध्ये 5.5 तर हातकणंगलेत 3.6 मि.मी. पाऊस झाला.

दिल्ली-मुंबईत 62 वर्षांनी एकाच दिवशी आला मान्सून..

 

देशाची राजधानी नवी दिल्ली व देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मान्सून एकाच दिवशी दाखल झाल्याचे आजवरचे दोन योग जुळून आले आहेत. 25 जून 2023 रोजी मुंबई व दिल्लीत एकाच दिवशी मान्सून दाखल झाला. या पूर्वी 21 जून 1961 रोजी या दोन्ही शहरांत तो एकाच दिवशी दाखल झाला होता. हा योग तब्बल 62 वर्षांनी जुळून आला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा