नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सावर्डे पा. मधील शिवाजीराव खोराटे विद्यालयात जागतिक योग दिन साजरा – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

सावर्डे पा. मधील शिवाजीराव खोराटे विद्यालयात जागतिक योग दिन साजरा

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

 

योगाचे प्रात्यक्षिक करताना विद्यालयाचे विद्यार्थी

सावर्डे पा. : जीवनात आरोग्य हीच खरी संपत्ती मानली जाते आणि या संपत्तीचे जतन करण्यासाठी योगा महत्त्वाचा आहे हे ओळखून २१ जून हा दिवस जागतिक योगा दिन म्हणून साजरा केला जातो याच दिवसाचे महत्त्व ओळखून राधानगरी तील सावर्डे पा. गावातील श्री. शिवाजीराव खोराटे विद्यालयातील पटांगणात नेहरु युवा केंद्र, कोल्हापूर व श्री शिवाजीराव खोराटे विद्यालय भाग शाळा सावर्डे पाटणकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला.


यावेळी योग प्रशिक्षक म्हणून डी बी पोवार सर लाभले. तसेच विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षकांनी देखील सहभाग घेतला होता. या प्रसंगी विद्यालयाचे भाग शाळा विभाग प्रमुख श्री जी आर पाटील सर, सुनील वागवेकर सर, एस एस आदमापूरे सर व शिपाई मधुकर कांबळे तसेच नेहरू युवा केंद्र, कोल्हापूर चे राधानगरी तालुका स्वयंसेवक गौरव पाटील उपस्थित होते.

योगाचे प्रात्यक्षिक दाखवताना विद्यालयाचे अध्यापक पवार सर.

नेहरू युवा केंद्र संघटना हे भारत सरकारच्या युवक व क्रीडा मंत्रालयाअंतर्गत असलेली स्वायत्त संस्था आहे. हिची स्थापना १९७२ साली झाली. या संस्थेचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. ही संघटना युवकांमध्ये, विशेषतः ग्रामीण भागात राष्ट्रनिर्मिती व देशभक्तीच्या भावनेला जागृत करण्याचे कार्य करते. याच संस्थेत राधानगरी तालुका स्वयंसेवक म्हणून याच गावचे सुपुत्र गौरव पाटील हे गेली दोन वर्षे काम करत आहे. त्यांच्याच संकल्पनेतून हा योग दिवस शाळेच्या प्रांगणात साजरा करण्यात आला.

विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करताना विद्यालयाचे अध्यापक व गौरव पाटील

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा