नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , दूधगंगा धरणाचा पाणीसाठा कमी करण्यामागचे खरे कारण स्पष्ट – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

दूधगंगा धरणाचा पाणीसाठा कमी करण्यामागचे खरे कारण स्पष्ट

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

राधानगरी प्रतिनिधी : दूधगंगा धरणाच्या तांत्रिक अभ्यासानुसार स्थैर्यता व सुरक्षिततेसाठी धरणातील ६ टीएमसी पाणीसाठा कमी करण्यात आल्याचा खुलासा दूधगंगा कालवे विभाग क्र.१ च्या कार्यकारी अभियंता विनया बदामी यांनी सोमवारी केला. मागील आठवड्यात आमदार हसन मुश्रीफ यांनी जलसंपदा विभागामुळे कोल्हापूरवरपाणीबाणी ओढवल्याचा आरोप केला होता.

राधानगरी तालुक्यातील दूधगंगा प्रकल्प अंतर्गत २५.४० टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्यात आले असून, २००६ पासून त्यात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा केला जातो. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टर क्षेत्र सिंचित असून, प्रकल्पाच्या आंतरराज्यीय करारानुसार कर्नाटकला ४ टीएमसी पाणी दिले जाते. धरणाचा सांडवा व काही भाग असा ४९० मीटर लांबीचे दगडी बांधकाम असून, २००७ पासून गळती आहे. सुरुवातीला सेकंदाला ३६० लि. से. इतकी दुरुस्तीनंतर १६६ लि से. गळती निदर्शनास आली. मात्र, २०२१-२२ मध्ये पुन्हा ३५० लिटर गळती दिसून आली.

त्यामुळे जलसंपदा विभागांतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व केंद्र शासनाच्या पुण्यातील सीडब्ल्यु, पीआरएस संस्थेकडून पाहणी करून घेतली. त्यानुसार ही गळती धरणाच्या बांधकामाला छेद देऊन खालील बाजूस पाणी उसळत असल्याने व धरणाच्या बांधकामाची घनता कमी झाल्याने वाढली आहे. गळती काढण्यासाठी प्रशासकीय मान्यता, सोपस्कार पूर्ण करून काम हाती घेईपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून पाणीसाठा १९.६८ टीएमसी इतकाच करावा असे निर्देश देण्यात आले.

गळती काढण्यासाठी ग्राऊटिंग व इतर बांधकाम पद्धतीचे ८०.३६ कोटीचे अंदाजपत्रक जलसंपदा विभागाकडे अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहे. पावसाळा लांबल्याने धरणातील पाणी १५ जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आल्याचे जलसंपदा विभागाने म्हटले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा