नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सरवडे गावातील वारकऱ्याचा रेल्वे अपघातात मृत्यू – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

सरवडे गावातील वारकऱ्याचा रेल्वे अपघातात मृत्यू

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

सरवडे प्रतिनिधी :पंढरपूरकडे निघालेल्या वारीतील सरवडे गावातील वारकऱ्याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. आनंदा विठ्ठल व्हरकट ( वय ४९) असे या मृत वारकरी यांचे नाव आहे

आनंदा विठ्ठल व्हरकट ( वय ४९) हे पंढरपूरला निघालेल्या पायी दिंडीत सहभागी झाले होते. वारकऱ्याचा लोणंद येथे रेल्वे अपघातात मृत्यू झाला. आज (दि. १९) सकाळी सहाच्या सुमारास रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेच्या जोरदार धडकेत आनंदा यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात झाली आहे. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आला. वारीत ट्रक चालकाचे काम करणार्‍या या वारकर्‍याचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत असून सरवडे गावावर शोककळा पसरली आहे.

अनेक वर्षे गावातून जाणार्‍या आषाढी दिंडीत व्हरकट सहभागी व्हायचे. यावर्षी देखील सहभागी झाले होते. दिंडीत ट्रक चालवण्याची सेवा करीत होते. त्यांच्या मागे आई, तीन भाऊ, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा