नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अक्षय भालेराव खून प्रकरणात आरोपींना फाशी होण्यासाठी वैभव गिते नावाचा पँथर मंत्रालयात जाऊन धडकला – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

अक्षय भालेराव खून प्रकरणात आरोपींना फाशी होण्यासाठी वैभव गिते नावाचा पँथर मंत्रालयात जाऊन धडकला

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

रविवार दि.११/०६/२०२३

बातमीदार/नांदेड

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून बोंडार हवेली या गावात अक्षय भालेराव यांची निर्घृण हत्या करण्यात आली.या गुन्ह्यातील आरोपींना फाशी होण्यासाठी व घटनेचा निषेध करण्यासाठी संविधानप्रेमी आंबेडकरी समाज सनदशीर मार्गाने राज्यभर तालुका स्तरावर,जिल्हा स्तरावर,पोलीस स्टेशनच्या समोर मोर्चे,धरणे,आंदोलने करून निषेध व्यक्त करीत आहे.नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव आक्रमक अभ्यासू वैभव गिते यांनी थेट मंत्रालयामध्ये घुसून मंत्रालय दणाणून सोडले.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे (IAS) यांना भेटून चर्चा करून निवेदन सादर केले.उपविभागीय पोलीस अधिकारी गुरव हे तपासात जाणून बुजून त्रुटी ठेवत असून तपास गुणवत्तेच्या आधारावर होत नाही.परिस्थिती जन्य व तांत्रिक पुरावा तसेच डिजीटल पुरावे घेतले जात नाहीत.योग्य कलमांचा समावेश करत नाहीत.असे 1 ते 31 मुद्यांचे निवेदन वैभव गिते यांनी सादर करताच महाराष्ट्र शासन ऍक्शन मोडमध्ये आले आहे.शासनाने अपर मुख्य सचिव गृह विभाग,पोलीस महासंचालक,जिल्हाधिकारी नांदेड,जिल्हाधिकारी नांदेड, आयुक्त समाजकल्याण पुणे,विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड,पोलीस अधीक्षक नांदेड यांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.शासनाने दिलेल्या पत्रात असे म्हंटले आहे की,वैभव गिते यांनी दिलेल्या पत्रातील मुद्दे गंभीर स्वरूपाचे असून त्याअनुषंगाने नियमानुसार कारवाई करावी.प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्याने आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.असे आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिले आहेत.वैभव गिते यांनी ज्या दिवशी निवेदन दिले त्याच दिवशी शासनाने तीन सनदी (IAS)अधिकारी व तीन (IPS) अधिकारी यांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.शासनाने पत्राच्या सोबत वैभव गिते यांनी दिलेले निवेदन जोडले असून मुद्देनिहाय अहवाल मागितला असल्याने नांदेड जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना कारवाई करावीच लागेल.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात भारत लोकशाही गणराज्य होऊन संविधाना अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत असताना राज्यात बौद्ध, दलित आदिवासींच्या हत्या राजरोसपणे होत आहेत यासाठी राज्य शासनाने ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे असे वैभव गिते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी राजेश साळे,नरेश जाधव,नवनाथ भागवत,प्रणव भागवत हे निवेदन देताना उपस्थित होते

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा