नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कोल्हापुरातील राड्यामुळे १ हजार कोटी पंचगंगेत बुडाले; इंटरनेट बंदमुळे पाहा किती झालं नुकसान       – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

कोल्हापुरातील राड्यामुळे १ हजार कोटी पंचगंगेत बुडाले; इंटरनेट बंदमुळे पाहा किती झालं नुकसान      

संग्रहित फोटो

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कोल्हापुरातील इंटरनेट बंदचा फटका हा सर्वसामान्यांसह उद्योगांनाही बसला आहे. उद्योगांचे आणि आयटी कंपन्यांचे थोडे पार नव्हे तर शेकडो कोटींचे नुकसान झाले आहे. बँकांचे व्यवहारही ठप्प झाल्याने नुकासन झाले आहे. तर आयटी कर्मचाऱ्यांना शनिवारी वर्क फ्रॉम करण्याची सूचना देण्यात आली आहे. कोल्हापुरात झालेल्या दंगलीला रोखण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील इंटरनेट सुविधा तब्बल ४२ तास बंद ठेवली, याचा फार मोठा फटका आर्थिक उलाढालीला बसला. केवळ बँका, पतसंस्थाच नव्हे; तर अनेक दुकानांतील आर्थिक व्यवहारच ठप्प झाले. त्यामुळे दुकान उघडे असूनही व्यवहार मात्र झाले नाहीत. ‘इंटरनेट बंद’चा फटका ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही बसल्याने आयटी क्षेत्राचे मोठे नुकसान झाले.

कोल्हापूर शहरातील काही युवकांनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानंतर शहरात दंगल झाली. अनुचित प्रकार घडू नये म्हणून बुधवारी सायंकाळनंतर इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. ही सेवा गुरुवारी दिवसभर; तर शुक्रवारी सकाळी दहापर्यंत बंद होती. ४० तासांपेक्षा अधिक काळ इंटरनेट बंद राहिल्याने जिल्ह्याच्या आर्थिक उलाढालीला मोठा दणका बसला.

  सरकारचा एक निर्णय आणि जिल्ह्यात कोट्यवधीचा फटका, राड्यानंतर नेमकं काय झालं?

सर्व प्रकारच्या दुकानांत, अगदी भाजीपाला खरेदीसाठीही हल्ली ‘यूपीआय’च्या माध्यमातून व्यवहार केले जातात. इंटरनेट बंद असल्याने या आर्थिक व्यवहारांवर मर्यादा आल्या. जिल्ह्यात ‘वर्क फ्रॉम होम’ करणारे वीस हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. इंटरनेट बंद राहिल्याने त्यांचेही काम ठप्प झाले.

(पत्रकार – उत्तम कांबळे केनवडेकर)

संग्रहित फोटो

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा