नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , बलिंगा दरोडाप्रकरणी एकजण ताब्यात ; पोलिसांची कठोर कारवाई – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

बलिंगा दरोडाप्रकरणी एकजण ताब्यात ; पोलिसांची कठोर कारवाई

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कोल्हापूर (बालिंगा) : बालिंगा दरोडा प्रकरणी आज पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले. तो बालिंगा परिसरातील तरुण आहे. पोलिसांनी चारही दरोडेखोरांनी वापरलेल्या दोन्ही मोटारसायकली खुपिरे येथील शेतातून जप्त केल्या. लवकरच या दरोड्याचा छडा लागेल, असा विश्वास पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी व्यक्त केला. दरोडेखोरांच्या गोळीबार आणि हल्ल्यात जखमी झालेले रमेश माळी व जितू माळी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

बालिंगा (ता. करवीर) येथील कात्यायनी ज्वेलर्सवर काल (ता. ८) भरदिवसा सशस्त्र दरोडा दुचाकी चोरीच्या, दरोड्यापूर्वी रेकीही*दरोड्यात वापरलेल्या दोन्ही दुचाकी चोरीच्या असल्याचे तपासात स्पष्ट झाले.

तसेच, दरोडेखोर शहर किंवा आसपासच्या ग्रामीण भागातील असावेत, असा प्राथमिक आहे. त्यांना या परिसराची माहिती असून, त्यांनी रेकी करूनच हे कृत्य केल्याचे तपासातून पुढे आले आहे.

अजूनही भीतीचे वातावरण

बालिगा गावातील रहदारीच्या रस्त्यावर घडलेला हा थरार अजूनही ग्रमस्थांच्या मनात आहे. या परिसरात भीतीचे वातावरण असून, सर्वत्र दरोड्याची चर्चा आहे.

( वार्ताहरभिकाजी पाटील कोल्हापूर )

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा