नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कोल्हापुरातील आंदोलनाला हिंसक वळण; आंदोलनात पोलिसांचा लाठीमार – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

कोल्हापुरातील आंदोलनाला हिंसक वळण; आंदोलनात पोलिसांचा लाठीमार

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कोल्हापूर : काल (६जून) शिवराज्याभिषेक दिनी संपूर्ण महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा होत असताना कोल्हापुरातील तीन मुस्लिम तरुणांनी आपल्या मोबाईल वरील व्हॉट्स ॲप वरील स्टेटस वर औरंगजेबाची छायाचित्रे व आक्षेपार्ह मजकूर लिहिला होता  त्यामुळे कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होऊन कोल्हापुरात तणाव जन्य वातावरण निर्माण झाले ही स्थिती आटोक्यात आणण्यासाठी कालपासून कोल्हापुरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले. असे असूनही हिंदुत्ववादी संघटनांनी आज आंदोलन केले या आंदोलनात जमाव प्रचंड आल्याने  नागरिकांना हटकण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. सोशल मीडियावर औरंगजेबासंदर्भातली पोस्ट टाकणाऱ्यांवर, सामाजिक सलोखा बिघडवू इच्छिणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलन करणाऱ्या नागरिकांनी केली.

पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोल्हापूरमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.

याआधी समाजकंटकांवर कारवाई व्हावी अशी मागणी करत हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली. पोलिसांनी जमावबंदी जाहीर केली असूनही मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर आले. घोषणाबाजी सुरू झाली आणि बंदला हिंसक वळण लागले. पोलिसांनी तातडीने कारवाई केली. जमावावर लाठीमार करण्यात आला. यानंतर कडेकोट बंदोबस्त ठेवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सध्या कोल्हापूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

शिवराज्याभिषेक दिनी नेमके काय घडले?

शिवराज्याभिषेक दिनी कोल्हापूरातील तीन मुस्लिम युवकांनी औरंगजेबाची छायाचित्रे Whatsapp Status म्हणून ठेवली होती. सोबत आक्षेपार्ह मजकूर होता. याच मुद्यावरून हिंदुत्ववादी संघटना कोल्हापूरमध्ये आक्रमक झाल्या आहेत. सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या मुस्लिम युवकांवर कारवाई करावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटना करत आहेत. पोलिसांनी Whatsapp Status प्रकरणी 2 युवकांना ताब्यात घेतले असून तिसऱ्या युवकाचा शोध घेत आहेत.

कोल्हापूर बंद मधील महत्त्वाच्या बाबी –

  1. कोल्हापूर बंदमुळे ग्रामीण भागात शाळेत जाणाऱ्यांचे हाल
  2. कार्यकर्त्यांची आणि पोलिसांची बाचाबाची, संतप्त कार्यकर्त्यांची दगडफेक
  3. कोल्हापूर शहरात बिंदू चौकात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली दगडफेक
  4. कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केल्याने शिवाजी चौकात तणाव वाढला
  5. जमावबंदी आदेश झुगारून मोर्चा काढला म्हणून पोलिसांनी केली कारवाई
  6. कोल्हापूर शहरात बंदमुळे कारभार ठप्प, संपूर्ण कोल्हापूर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा