नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जयघोषाने रायगड दणाणला – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

जयघोषाने रायगड दणाणला

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

प्रज्ञावंत ऑनलाईन
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा ३४९ वा वर्धापनदिन राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. शिवराज्याभिषेक दिनाचा मुख्य सोहळा किल्ले रायगडावर संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत संपन्न झाला तर कोल्हापुरातील नवीन राजवाड्यावर शाहू महाराजांच्या उपस्थितीत आणि पुण्यातील लाल महलामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी गर्दीने संपूर्ण परिसर फुलला होता. मोठ्या संख्येने उपस्थित शिवभक्तांनी केलेल्या शिवरायांच्या जयघोषाने अवघा रायगड दुमदुमून गेला होता.
शिवराज्याभिषेक दिन सोहळ््यासाठी हजारो शिवभक्त मावळ््यांच्या वेशभूषेत किल्ले रायगडावर दाखल झाले होते. या सोहळ्याच्या निमित्ताने किल्ले रायगडावर एकीकडे ढोलताशाचा गजर सुरू होता तर दुसरीकडे गुलालाची उधळण करण्यात आली. या सोहळ््याला धनगर नृत्याने तर आगळीच बहार आणली. छत्रपती शिवरायांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी विधिवत पूजा करून शिवछत्रपतींचा राज्याभिषेक दिन साजरा केला.
या राज्याभिषेक सोहळ््यासाठी चंदुकाका सराफ अँड सन्सकडून सोन्याच्या खास ३५० होनांची निर्मिती करण्यात आली होती. याच सोन्यांच्या होनांनी शिवरायांना अभिषेक करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ््यासाठी देशभरातून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल झाले होते. त्यामुळे संपूर्ण रायगड परिसर गर्दीने फुलून गेला होता. यावेळी सर्वत्र शिवरायांचा जयघोष सुरू होता.
नवीन राजवाड्यात प्रथमच रंगला सोहळाकोल्हापुरातील नवीन राजवाड्यावर पहिल्यांदाच शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी शाहू छत्रपती महाराज, मालोजीराजे छत्रपतींसह राजघराण्यातील सदस्यांची उपस्थिती होती. या सोहळ््यासाठी राजवाडाही सजला होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णमूर्तीचा अभिषेक केला गेला. यावेळी झांजपथक, मिलिटरीचे बँड, पोलिसांचे बँड, शाहिरी पोवाडे यांचे सादरीकरण करण्यात आले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा