नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सावर्डे पा. ग्रामपंचायत कार्यालयात शिवराज्याभिषेक दिन साजरा – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

सावर्डे पा. ग्रामपंचायत कार्यालयात शिवराज्याभिषेक दिन साजरा

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

 

ग्रामपंचायत कार्यालयात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करताना मा. सरपंच व सदस्य 
सावर्डे पा. : संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्थान  म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज . यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला यावर्षी ३५० वर्षे पूर्ण होत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हा दिवस ( ६ जून) शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जात आहे. संपूर्ण विश्वाला वंद्य ठरणाऱ्या व प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत जाणाऱ्या या स्वराज्याला आजच्या दिवशीच महाराजांनी मूर्त रूप दिले होते. या निमित्ताने  महाराष्ट्र शासनाने किल्ले रायगड येथे मोठा सोहळा आयोजित केला आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी हा दिवस उत्साहात साजरा केला जात आहे.
ग्रा. पं. कार्यालयासमोर ध्वजाचे पूजन करताना सरपंच व ग्रामपंचायत सदस्य
याच कार्यक्रमाचे  औचित्य साधून राधानगरीतील सावर्डे पाटणकर या गावी ग्रामपंचायतीच्या वतीने हा शिवराज्याभिषेक दिन ग्रामपंचायत कार्यालयात साजरा करण्यात आला.  या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने मा. सरपंच श्रीमती सुमन विलास मोरे यांच्या हस्ते झाली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मा. डे. सरपंच सुरेश श्रीपती परीट यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य श्री. आनंदा बळवंत कांबळे, वसंत दत्तात्रय शेंडगे तसेच ग्रामपंचायत महिला सदस्या  सौ. संगिता शिवदास सावंत, गीता कृष्णात सुतार, वंदना सुनील गुरव तसेच ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग  व अंगणवाडी सेविका  इ. उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शिवाजीराव खोराटे विद्यालय सरवडे भागशाळा सावर्डे पा. चे अध्यापक सुनील वगवेकर सर  त्याचबरोबर विद्यार्थी देखील सहभागी झालेले होते.

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा