नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन. त्या सुश्रुषा हॉस्पिटलमध्ये एडमिट होत्या. त्यांच्या निधनानं सगळीकडे शोक व्यक्त करण्यात आला आहे. त्याच्या लेकीनं कांचन घाणेकर यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल सांगितले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली होती. अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये भुमिका केल्या आहेत. ‘मराठी तितुका मेळवावा’ या चित्रपटातून त्यांनी जिजाऊ यांची भुमिका केली होती.

सुलोचना दीदींचं मूळ नाव सुलोचना लाटकर.. कोल्हापूरमधल्या खडवलट गावी सुलोचना दीदींचा जन्म झाला.. 250 हून अधिक मराठी आणि 150 हून अधिक हिंदी सिनेमांमध्ये दीदींनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय.. तंबूतल्या चित्रपटानं सुलोचना दीदींना चित्रपटांची ओढ निर्माण केली.. पण त्यांचं खरं शिक्षण झालं ते गुरु भालजी पेंढारकरांच्या मार्गदर्शनाखाली. ‘जय भवानी’ या सिनेमातून सुलोचना दीदी नायिका म्हणून समोर आल्या. ‘मराठा तितुका मेळवावा’ या सिनेमातल्या जिजाऊंच्या भूमिकेमुळं सुलोचना दीदींचं वेगळं रुप समोर आलं. त्याशिवाय वहिनीच्या बांगड्या, भाऊबीज, बाळा जोजो रे, चिमणी पाखरं, प्रपंच, स्त्री जन्मा तुझी ही कहाणी, पारिजातक हे दीदींचे तुफान गाजलेले चित्रपट..  मोलकरीण आणि एकटी या सिनेमात दीदींनी साकारलेली सोशिक आईची भूमिका म्हणजे केवळ लाजवाब..

मराठीप्रमाणेच हिंदी पडदाही सुलोचना दीदींनी गाजवला.. बिमल रॉय यांच्या सुजाता चित्रपटात त्यांनी साकारलेली संवेदनशील आईची भूमिका बरीच गाजली.. हिंदी चित्रपटांमध्ये त्या पडद्यावर अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, राजेंद्र कुमार, शशी कपूर या आघाडीच्या नायकांच्या त्या आई झाल्या.. सुलोचना दीदींना पद्मश्री, महाराष्ट्र भूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं..आता त्याच्या चाहत्यांनी प्रतिक्षा आहे ती दीदींना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळण्याची.. एकाचवेळी खानदानी तेज, करारीपणा, घरेलू साधेपणा, आणि पराकोटीची सोशिकता आपल्या अभिनयातून दाखवल्यामुळे त्यांचं वेगळेपण वेळोवेळी दिसून आलं..

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा