नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अंबाबाई मंदिरात वडाच्या झाडाला लागली आग, महिलांची भितीनं तारांबळ उडाली – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

अंबाबाई मंदिरात वडाच्या झाडाला लागली आग, महिलांची भितीनं तारांबळ उडाली

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

उत्तम कांबळे केनवडेकर: अंबाबाई मंदिरात पूजा करत असताना अचानक झाडाने पेट घेतल्याने वडाची पुजा करणाऱ्या महिलांना पळता भुई थोडी झाली. मंदिर प्रशासनाने वेळीच आग विझवल्याने अनर्थ टळला. कापूर आणि उदबत्तीची आग वटपौर्णिमेच्या पूजेनिमित्त बांधलेल्या दोऱ्याला लागल्याने हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

दरवर्षी मोठ्या संख्येने अंबाबाई मंदिरातील वडाच्या झाडाची पूजा पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी महिला करतात. यंदाही सकाळपासूनच मोठ्या संख्येने महिला अंबाबाई मंदिरात पूजा करण्यासाठी एकत्र जमल्या. दुपारच्या दरम्यान अचानक कापूर आणि उदबत्तीची आग वटपौर्णिमेच्या पूजेनिमित्त बांधलेल्या दोऱ्याला लागल्याने झाडाला आग लागली. सर्तकता बाळगत मंदिर परिसरातील यंत्रणेने आग आटोक्यात आणली. अग्निरोधक मशीनच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा