नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे यांची पुणे येथे बदली – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे यांची पुणे येथे बदली

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

राज्यात पुन्हा एकदा आयएएस दर्जाच्या अधिकाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासकीय अधिकारी कादंबरी बलकवडे यांची पुणे येथे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणच्या महासंचालक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्याच आठवडय़ात कादंबरी बलकवडे यांचे पती व कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक असलेले शैलेश बलकवडे यांची पुणे येथे बदली झाली आहे.

सन 2021 मध्ये जिल्ह्यात आलेल्या महापुरात महापालिकेचे तत्कालीन आयुक्त कलशेट्टी यांनी प्रभावी काम केले होते. कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून शैलेश बलकवडे यांच्या नियुक्तीनंतर काही दिवसांतच महापालिका आयुक्त कलशेट्टी यांच्या जागी आयुक्त म्हणून कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती झाली होती. याच काळात महापालिका सभागृहाची मुदत संपल्याने कादंबरी बलकवडे यांच्याकडे महापालिकेच्या प्रशासकपदाची जबाबदारी आली. दोन वर्षांहून अधिक काळ त्यांनी प्रशासक म्हणूनच कामकाज पाहिले.

 

 

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा