नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंना मारहाण करणा-या ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाची पक्षातून हकालपट्टी – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंना मारहाण करणा-या ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाची पक्षातून हकालपट्टी

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

    पत्रकार – उत्तम कांबळे

 बीड : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंना दोन चापटा मारल्याचा दावा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केला होता. तसा त्यांनी व्हिडीओ देखील बनवला होता. मात्र त्यानंतर सुषमा अंधारेंना मारहाण केल्याचा दावा करणाऱ्या आप्पासाहेब जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

पक्षविरोधी कारवाया केल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच सुषमा अंधारे यांनी देखील शिंदे गटाची ही स्क्रिप्ट असल्याचा आरोप केला आहे. विशेश म्हणजे या जिल्हाप्रमुखाने सुषमा अंधारे दादागिरी करत पैसे मागतात म्हणून आपण त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला होता.

जाधव यांनी एका व्हिडीओमध्ये सांगितले आहे की, ‘बीडमध्ये ठाकरे गटाच्या प्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत देखील उपस्थित राहणार आहेत. शनिवारी ही सभा होणार आहे. या सभेची पाहणी करण्यासाठी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह उपनेत्या सुषमा अंधारे देखील तेथे आल्या होत्या. त्या सध्या जिल्ह्यात दादागिरी करत आहेत. आमच्या पदाधिकाऱ्यांकडे पैसे मागत आहेत. एसी, सोफ्यासाठी हे पैसे त्या मागत आहेत.’

त्या माझे पदही विकायला लागल्या आहेत. मी पक्ष वाढीसाठी अत्यंत प्रयत्न करत आहे. मी पक्ष वाढीसाठी रात्र अन् दिवस मेहनत करत आहे, रक्ताचं पाणी करत आहे, हाडाची काडं करत आहे. माझ्या लेका-बाळाच्या मुखातील पैसे खर्च करुन पक्ष वाढवत आहे. पण त्यावर त्यांचं लक्ष नाही. यातूनच सुषमाताई अंधारे आणि माझ्यात बाचाबाची झाली. याच वादातून मी त्यांना दोन चापटा मारल्या, अशी कबुली बीडमध्ये ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी दिली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा