नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , हजारो शिव अनुयायांच्या सोबत ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

हजारो शिव अनुयायांच्या सोबत ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न

Featured Video Play Icon
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

अवघ्या महाराष्ट्रच काय तर देशाचा उर अभिमानाने भरून यावा असा आजचा दिवस आहे. आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला म्हणजेचं शिवराज्याभिषेकाला तिथीनुसार 350 वर्ष पुर्ण होत आहेत. 350 वर्षापूर्वी आजच्या दिवशी दख्खन देशाचे स्वामी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजधानी किल्ले राजगडावर दिमाखात शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला होता. या निमित्तानं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आज स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या पायथ्याशी 1 जून ते 7 जून या काळात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी शासनाकडून 350 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे. आज 2 जून रोजी सकाळच्या सुमारास या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी त्यांनी “शिवाजी महाराजांनी स्वराज्य, धर्म, संकृती यांना धक्का पोहोचवणाऱ्यांना इशारा दिला. यामुळे जनतेत दृढ आत्मविश्वास वाढला. शिवाजी महाराजांचे इतके पैलू आहेत की, कोणत्या नाकोणत्या रुपात त्यांचं जीवन आपल्याला प्रभावित करतं”, असं म्हटलं. या सोहळ्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लंडनमधील भवानी तलवार आणि वाघनखं राज्यात परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं सांगितंल. यासाठी राज्याचे मंभी सुधीर मुनगंटीवार प्रयत्न करत असून पंतप्रधान मोदी देखील यामध्ये आपल्याला मदत करणार असल्याचं ते म्हणाले. तसंच या नेत्रदिपक सोहळ्याला हजारो शिवभक्कांची उपस्थिती असून अनेक राजकीय व्यक्तीमत्व देखील हजर आहेत. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे, राम शिंदे अशा नेत्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर या सोहळ्याला सहकुटुंब उपस्थिती लावली आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा