नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ग्रामपंचायत सावर्डे पा. यांच्या वतीने पाच महिलांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्रदान – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

ग्रामपंचायत सावर्डे पा. यांच्या वतीने पाच महिलांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्रदान

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

सावर्डे पा. : महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे, या करिता प्रत्येक ग्रामपंचायत / गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने शासन निर्णय तयार करण्यात आला होता. दिनांक ३१ मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह तसेच रोख ५०० रूपये देऊन हा सन्मान ग्रामपंचायत कार्यालय परिसरात देण्यात यावा असे या शासन निर्णयात नमूद केले होते. या सन्मानाने महिलांना प्रोत्साहन देऊन सामाजिक क्षेत्रात स्त्रियांचे योगदान वाढावे या हेतूने हा सन्मान देण्यात आला आहे.

याच कार्यक्रमाचे औचित्य साधून . राधानगरीतील सावर्डे पा. या गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने तब्बल पाच महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये     सौ.हेमा तानाजी गुरव ,सौ. संगिता गोपाळ कांबळे, सौ. कविता विष्णू परीट, सौ. विद्या विठ्ठल कवडे व सौ. कोमल शहाजी कांबळे पुरस्कार प्राप्त महिलांची नावे आहेत. या कार्यक्रमासाठी गावच्या लोकनियुक्त महिला सरपंच श्रीमती सुमन विलास मोरे तसेच ग्रामपंचायत सदस्य शिपाई व गावातील महिला तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. सदरचा पुरस्कार ग्रामपंचायतीच्या वतीने मा. सरपंच व सदस्याच्या हस्ते देण्यात आला असून हा  कार्यक्रम गावच्या प्राथमिक शाळेमध्ये

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा